सातारा : जिल्ह्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. यामुळे थंडी कमी झाली असून, उकाडा जाणवू लागला आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यात ढगाळ वातावरण होते. तसेच दोन दिवस अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यावेळी किमान तापमान वाढूनही हवेत गारवा होता. त्याचबरोबर गार वारेही वाहत होते. मात्र, दोन दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाली आहे. साताऱ्यात रविवारी १७.०५, तर सोमवारी १८.०३ अंशांची नोंद झाली. त्यामुळे थंडीचे प्रमाण एकदम कमी झाले आहे. त्यातच कमाल तापमानही वाढत चालले आहे.
सातारा शहरातील कमाल तापमान शनिवारी २८ अंशांवर होते, तर रविवारी ३०.०७ आणि सोमवारी ३१.०३ अंशांची नोंद झाली. यामुळे थंडी कमी होत असताना उकाडाही जाणवत असल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, हळूहळू कमाल तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे लवकरच ऊन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
...............................................