महाबळेश्वर : अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत (अॅट्रॉसिटी अॅक्ट) नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या हेतूने पोलिसांनी नागरिकांना कायद्याचे धडे दिले.महाबळेश्वर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे व समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, समतादूत प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे, विस्तार अधिकारी चव्हाण, गटविकास अधिकारी दिलीप शिंदे, सहायक गटविकास अधिकारी घोलप यांसह तालुक्यातील ग्रामसेवक व समतादूत आदी उपस्थित होते.अॅट्रॉसिटी कायद्याची माहिती देताना पोलीस निरीक्षक सावंत म्हणाले, ‘मागासर्वीय समाजावर होणारा अन्याय ही अत्यंत खेदजनक बाब आहे. यामुळे आपापसात तेढ निर्माण होतो. हे रोखण्यासाठी सर्वांना अॅट्रॉसिटी कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.’ गणेश सवाखंडे म्हणाले, ‘समाजात समतादूतांकडून समतेची शिकवण दिली जात आहे. याबरोबच अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीभ्रूण हत्या, याची जागृतीही नागरिकांमध्ये केली जात आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांनी दिले अॅट्रॉसिटी कायद्याचे धडे
By admin | Published: June 26, 2015 9:56 PM