शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

वीस वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे धडे

By admin | Published: July 04, 2016 10:44 PM

मलकापूरचे आनंदराव चव्हाण विद्यालय : आगाशिव डोंगरात दरवर्षी बीजारोपण

माणिक डोंगरे --मलकापूर  -येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालयात पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारे पर्यावरणपूरक शिक्षणाचे धडेही दिले जातात. विद्यालयातील हजारो विद्यार्थीगेल्या वीस वर्षांपासून सातत्याने जून-जुलै महिन्यांत बीजारोपण व वृक्षारोपणाचा उपक्रम राबवतात. त्यामुळे आगाशिव डोंगराला वेगळी झळाळी मिळाली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी आनंदराव चव्हाण विद्यालयाची १९८१ मध्ये स्थापना करण्यात आली. केवळ २५ विद्यार्थी घेऊन सुरू केलेल्या या शैक्षणित संकुलात आज पाचवी ते बारावी पर्यंत तब्बल १ हजार ९०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना ५१ शिक्षक अद्यापनाचे काम करतात. विविध प्रकारच्या शालेय व सहशालेय उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या जोडीला आदर्श ज्युनिअर कॉलेजची सुरुवात केली. सर्वांगीण विकास साधणारे हे शैक्षणिक संकुल आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच निसर्गसंवर्धनपर उपक्रमात आगाशिव डोंगरात बीजारोपण, वृक्षारोपण, लूज बोल्डर बंधारे यांसारख्या उपक्रमातून पर्यावरणपूरक शिक्षणही देण्यात येते. गेल्या वीस वर्षांत सातत्याने जून-जुलै महिन्यांत हे उपक्रम राबवल्याने आगाशिव डोंगर परिसरात झाडे लावली आहेत. तर बांध, बंधारे बांधल्यामुळे या भागातील जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या शैक्षणिक संकुलामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच व्यवहारिक, व्यावसायिक व सामाजिक संस्कार देऊन एक जबाबदार भारतीय नागरिक घडवण्याचा प्रयत्न या विद्यालयात सातत्याने होतो. प्रशस्त व सुसज्ज इमारत, स्वतंत्र प्रयोगशाळा, समृद्ध गं्रथालयसंगणक प्रशिक्षण वर्गअद्ययावत इंटरनेट कक्षाद्वारे आयटी प्रशिक्षणाची सोयडिजिटल क्लासरूमद्वारे अद्यापनाची सोयराष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून परिसर व निसर्ग निरीक्षण सहलीशासकीय चित्रकला परीक्षेसह सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षाक्रीडा गुणांकनासाठी उन्हाळी क्रीडा शिबिर व खेळांचे प्रात्यक्षिकवक्तृत्व, निबंध, सुंदर हस्ताक्षर, कथाकथन, रांगोळीस्पर्धा मार्गदर्शन केंद्रसंगीत व कला प्रशिक्षणबारावी नंतरच्या जे. ई. ई. व नीट स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन केंद्रपंढरीच्या मार्गावर व्यसनमुक्तीची दिंडीयंदा आठवे वर्ष : विलासबाबा जवळ यांच्या उपक्रमामुळे लाखो तरुण निर्व्यसनीसातारा : विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने शेकडो दिंड्या मार्गक्रमण करत आहेत. या दिंड्यांमध्येच एक दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मेढा येथील विलासबाबा जवळ हे गेली आठ वर्षे व्यसनमुक्ती दिंडी काढत आहेत. भजन, कीर्तन, भारुडाच्या माध्यमातून संतांनीही महाराष्ट्रात लोकजागृतीचे काम केले आहे. हीच परपंरा आजही जपली जात आहे. आषाढी वारीसाठी शेकडो दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. या दिंड्यांमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. यामध्ये शेतकरी, तरुणाईची मोठी संख्या असते. व्यसनमुक्त चळवळीच्या माध्यमातून वाहून घेतलेले विलासबाबा जवळ त्यांच्या कार्यासाठी या गर्दीचा फायदा करून घेत आहेत. बंडातात्या कराडकर व तत्कालीन अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या संकल्पनेतून वारीच्या वाटेवर २००८ मध्ये प्रचाराचा प्रारंभ झाला. व्यसनमुक्तीचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकरी कुटुंबातील माणूस व्यसनमुक्त झाला पाहिजे. गोपालनद्वारे सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळाला पाहिजे. ही या संघटनेची पूर्वीपासून भूमिका आहे. व्यसनमुक्तीसाठी वारीत सहभागी झाल्यानंतर काही गोष्टी निदर्शनास आल्या. वारीत सहभागी झालेल्यांमध्येही व्यसनाधिनता आढळते. तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट याबरोबरच काहींमध्ये गांजा या व्यसनांचे प्रमाण खूपच आढळून आले. वारीच्या वाटेवर चित्रफीत, लघुपट, पथनाट्याद्वारे व्यसनमुक्तीवर प्रबोधन केले जात आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. असंख्य तरुण व्यसनमुक्त दिंडीत सहभागी होतात. गाडीतळावर येऊन माउलींची शपथ घेऊन पुन्हा व्यसन न करण्याचा संकल्प करतात. खिशातील व्यसनी पदार्थ काढून पोत्यात जमा करतात. त्यामुळे दोन-दोन पोती सहज भरतात. गांजा ओढणारी किंवा विकणारे कोण आढळले तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाते. माउलींच्या सोहळ्यात प्रचाररथाचे नेतृत्त्व भानुदास वैराट करत आहेत. तुकोबारायांच्या सोहळ्यात कल्याण तावरे, संदीप होले तपास करत आहेत. उपाध्यक्ष शहाजी काळे मार्गदर्शन करत आहेत. (प्रतिनिधी)संतवचनांचा दाखलादिंड्यांमध्ये व्यसनमुक्ती संदर्भात प्रबोधन करत असताना थेट विरोध न करता त्यांना तुकाराम महाराजांच्या अभंगांचा दाखला दिला जातो. त्यांना माउलींची शपथ दिली जाते. त्यामुळे लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो.- विलासबाबा जवळ