मेढा : ‘जावळी तालुक्यातील गतवर्षी २०१३ मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत १ कोटी ३१ लाख ८ हजारांचा आर्थिक मदत दिली असून, यापैकी ५ लाख ६१ हजारांची मदत अद्याप शेतकऱ्यांनी घेतली नसून संबंधित शेतकऱ्यांनी ती त्वरित घ्यावी,’ असे आवाहन जावळीचे तहसीलदार रणजित देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी हे अनुदान न उचलल्यास शासनाकडे संबंधित रक्कम परत करण्यात येईल, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.याबाबत जावळीचे तहसीलदार रणजित देसाई यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, याबाबत तालुक्यातील गाव कामगार तलाठी, मंडल अधिकारी यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना याबाबत मध्यवर्ती बँकेत खाते उघडून अनुदानाची रक्कम घेण्यास सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांना नोटीस देऊन, परगावी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरावर नोटीस चिटकवून प्रसिद्धी देण्यात आली आहे.मात्र अद्याप तालुक्यातील ५२० शेतकऱ्यांनी अनुदानाची रक्कम न घेतल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मेढा, भणंग, गांजे, केळघर, करहर, तापोळा व हुमगाव या शाखांमध्ये एकूण ५ लाख ६१ हजार ४०५ रुपये शिल्लक आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी येत्या आठवडाभरात हे अनुदान खात्यातून काढून न घेतल्यास रक्कम शासनास परत करण्यात येईल, असेही तहसीलदार रणजित देसाई यांनी स्पष्ट केले आहे.जावळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये शासनाच्यावतीने नोटीसी चिटकवून माहिती दिली आहे. मात्र, शेतकरी अजूनही संबंधित रक्कम घ्यायला न आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांनी वेळेत पैसे नेले नाहीत तर हा सर्व निधी पुन्हा शासनाकडे परत जाईल, असेही देसाई यांनी सांगितले. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने ही मदत योग्य आणि आवश्यक कागदपत्रे दाखवून घेवून जावे, असे आवाहन केले आहे. (वार्ताहर)१०१ गावांसाठी १ कोटी ३१ लाखजावळी तालुक्यात जून, जुलै २०१३ मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे १०९ गावांमध्ये ५० टक्क््यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून १ कोटी ३१ लाख ८ हजारांचे अनुदान प्राप्त झाले. हे अनुदान सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जावळी तालुक्यातील विविध शाखांमार्फत आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.
नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांची पाठ
By admin | Published: January 29, 2015 9:09 PM