कऱ्हाड : ‘येथील कोटा अॅकॅडमीतर्फे रविवार, दि. २९ रोजी मेडिकल व इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षामध्ये यश मिळविण्यासाठी मोफत सेमिनार आयोजित केला आहे,’ अशी माहिती अॅकॅडमीचे संचालक महेश खुस्पे व मंजिरी खुस्पे यांनी दिली. वेणुताई चव्हाण स्मारक येथे रविवारी दुपारी चार वाजता सेमिनार सुरू होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ‘विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी’ या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. तर नामवंत शिक्षण तज्ज्ञ सौरभ मिश्रा ‘इंजिनिअरिंग व मेडिकल’साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेची तयारी कशी करावी, याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उच्चविद्या विभूषित आहेत. त्यांनी बी.टेक, बिट्स (पिलानी), तर अमेरिकेतून एम.टेक़ ची पदवी घेतली आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग प्रवेश परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी होणार आहे. ते स्वत: मेकॅनिकल इंजिनिअर असून, त्यांनी केंद्र शासनामध्ये तंत्रज्ञान खात्याचे मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. या कार्यशाळेतून इंजिनिअरिंग व मेकॅनिकल विविध शाखा, आय. आय. टी., एन. आय. टी. म्हणजे काय ? के. व्ही. पी. वाय, आय. आय . एस. टी., बिट्स, व्ही. आय. टी., एन. डी. ए., ए. आय. आय. एम. एस., इस्त्रो, आय. आय. आय. टी. परीक्षा कशा द्यायच्या याची माहिती मिळणार आहे. तसेच नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना बदललेल्या अभ्यासक्रमांचीही माहिती मिळणार आहे. कोटा अॅकॅडमी २००७ पासून कऱ्हाडात मार्गदर्शन करत आहे. आत्तापर्यंत कोटा अॅकॅडमीचे ४२ विद्यार्थी आय. आय. टी. ला निवडले गेले आहेत. तर एन.आय. टी. ला ४० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. बिट्स, पिलानी तसेच महाराष्ट्रातील नामवंत महाविद्यालयांत कोटा अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. तरी कोटा अॅकॅडमीच्या या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही खुस्पे यांनी केले आहे. (प्रतिनिधी) इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षामध्ये यश मिळविण्यासाठी मोफत सेमिनार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ‘विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी’ या विषयावरती मार्गदर्शन करणार
पृथ्वीराज चव्हाण देणार तंत्रज्ञानाचे धडे
By admin | Published: March 27, 2015 10:53 PM