शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

बारामतीला या.. आपण चर्चा करू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 11:17 PM

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताºयात खासदार गटाने केलेल्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी खासदार शरद पवार यांनी स्वत: यावे, अशी मागणी उदयनराजे गटाने पवारांकडे केली. त्यावर बारामतीला या चर्चा करू, असे आवतन पवारांनी दिले आहे.खासदार शरद पवार जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्यासोबतच गाडीतून आले होते. बुधवारी सकाळी खासदार पवार ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताºयात खासदार गटाने केलेल्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी खासदार शरद पवार यांनी स्वत: यावे, अशी मागणी उदयनराजे गटाने पवारांकडे केली. त्यावर बारामतीला या चर्चा करू, असे आवतन पवारांनी दिले आहे.खासदार शरद पवार जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्यासोबतच गाडीतून आले होते. बुधवारी सकाळी खासदार पवार शासकीय विश्रामगृहावर आल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या आघाडीच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपनगराध्यक्ष राजू भोसले, अ‍ॅड. दत्ता बनकर, पाणीपुरवठा सभापती सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी लक्ष्मण गोरे या ठिकाणी उपस्थित होते.खासदार पवार शिवनेरी दालनात आल्यानंतर खासदार गटाने त्यांच्याशी सातारा शहरातील विकासकामांबाबत चर्चा केली. शहरातील कास धरण उंची वाढविण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून, त्याचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. भुयारी गटार योजना, घनकचरा निर्मूलन प्रकल्प, पोवईनाका येथील उड्डाणपूल या विकासकामांचे भूमिपूजन खासदार शरद पवार यांनी करावे, अशी इच्छा उदयनराजे गटाने यावेळी व्यक्त केली.सध्या शहरातील विकासकामांच्या मंजुरीवरून दोन्ही गटांत जोरदार श्रेयवाद सुरू आहे. त्यातच खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीविरोधी धोरणे कशाप्रकारे राबवितात. याविषयी राष्ट्रवादीचे नेते तक्रारी करतात.खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीपासून दूर गेले आहेत, असे दाखविले गेले. पण पवारांनी अजून उदयनराजेंना दूर केलेले नाही, हे बुधवारच्या दौºयानंतर स्पष्ट झाले.येत्या भाऊबिजेनंतर दुसºया दिवशी बारामतीत या, चर्चा करू,असे आश्वासनही पवारांकडून मिळाल्याने उदयनराजे गटाला गुदगुल्या झाल्या नसतील तर नवलच. मात्र, यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या गटामध्ये भलतीच अस्वस्थता पसरली.खासदार शरद पवार यांनी पुण्यातून साताºयापर्यंतच्या प्रवासात खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मावळ्यांना बारामतीत येण्याचे आवतनही दिले.आमदार बाहेरच थांबलेखासदार शरद पवार यांचे स्वागत करण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे विश्रामगृहावर आले होते. खासदार उदयनराजे व त्यांचा संपूर्ण गट खासदार पवारांशी चर्चा करत असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सर्किट हाऊसमध्ये बाहेरच थांबून राहिले होते.