खंडाळा : मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यात यावे. आरक्षण हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात ग्रामीण भागातील लोकांच्या भावना थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्यासाठी खंडाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी १०० पत्रे पाठविण्यात आली आहेत.
राज्यात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरू आहेत. मात्र लोकांच्या अडचणी व आरक्षणाचा हेतू केंद्र सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खंडाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने १०० पत्रे पाठविण्यात आली आहेत. अशाच पद्धतीने प्रत्येक गावातून १०० पत्रे पाठविण्याचा निर्धार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय भोसले यांनी व्यक्त केला.
ही सर्व पत्रे एकत्रितपणे टपालपेटीत टाकण्यात आली आहेत. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अजय भोसले यांच्यासमवेत प्रदीप गाढवे, जिजाबा काळे, महेंद्र गाढवे, अशोक ननावरे, माउली जगताप, सौरभ गायकवाड, श्रीनाथ यादव यांसह तालुक्यातील इतर पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो २९खंडाळा लेटर
खंडाळा तालुक्यातून मराठा आरक्षणाची मागणी करणारी पत्रे पंतप्रधानांना पाठविण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अजय भोसले, प्रदीप गाढवे, जिजाबा काळे, महेंद्र गाढवे, अशोक ननावरे, माऊली जगताप, सौरभ गायकवाड, श्रीनाथ यादव यांसह तालुक्यातील इतर पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.