शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

वडिलांसोबत फिरायला गेलेल्या बालकाचे अपघाताने संपवले आयुष्य

By admin | Published: October 17, 2016 12:45 AM

आईचा आक्रोश : सांबरवाडीतील बालकाचा अपघातात मृत्यू

सातारा : वडिलांसोबत दुचाकीवरून फिरायला जात असताना दुचाकी नाल्यात पडल्याने जखमी झालेल्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. वडिलांसोबत फिरणे त्या बालकाचे अखेरचेच ठरले. विकास चंद्रकांत फडतरे (वय ४, रा. सांबरवाडी, ता. सातारा) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. हा अपघात रविवारी दुपारी चारच्या सुमारास सांबरवाडीजवळ झाला. याबाबत जिल्हा रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विकास हा वडील चंद्र्रकांत फडतरे यांच्या समवेत रविवारी दुपारी चार वाजता दुचाकीवरून फिरण्यासाठी घराबाहेर पडला होता. सांबरवाडीपासून काही अंतरावर गेल्यानंतर चंद्रकांत फडतरे यांचा गाडीवरून अचानक ताबा सुटला. त्यामुळे गाडी नाल्यात जाऊन जोरदार आदळली. त्यामध्ये विकासच्या डोक्याला आणि हाताला पायाला गंभीर जखम झाली. या अपघातानंतर फडतरे यांनी इतर नागरिकांच्या मदतीने विकासला नाल्यातून बाहेर काढून मिळेल त्या वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासले असता उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलाचा अपघात झाल्याचे समजल्यानंतर विकासच्या आईने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली; परंतु मुलगा मृत झाल्याचे समजताच विकासच्या आईने हंबरडा फोडला. आईने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असला तरी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)