शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

मुलाचा खून करणाऱ्या पित्याला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:42 AM

सातारा: पती-पत्नीच्या कौटुंबिक कलहातून संतप्त झालेल्या पित्याने दारूच्या नशेत आठ वर्षांच्या मुलाला विष पाजून चिमुकल्याचा खून केल्याप्रकरणी जिल्हा प्रमुख ...

सातारा: पती-पत्नीच्या कौटुंबिक कलहातून संतप्त झालेल्या पित्याने दारूच्या नशेत आठ वर्षांच्या मुलाला विष पाजून चिमुकल्याचा खून केल्याप्रकरणी जिल्हा प्रमुख न्यायाधीश आर.डी. सावंत यांनी पित्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, ही शिक्षा व्हिडीओ कान्फरन्सिंगवर सुनावण्यात आली.

शिवराज संतोष भिंगारे (वय ८ वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून, संतोष लक्ष्मण भिंगारे (वय ३५, सध्या रा.पाचवड ता.वाई मूळ रा.कडेगाव जि.सांगली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पित्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संतोष भिंगारे व वैशाली भिंगारे यांना दोन मुले. दोघा पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होता. यातूनच पत्नी दोन्ही मुलांसह माहेरी कडेगाव येथे राहत होती, तर पती पाचवड येथे राहत होता. शिवराज हा कडेगाव येथील शाळेत जात होता. दि. ४ मार्च, २०१७ रोजी आरोपी संतोष भिंगारे याने कडेगाव येथील शिवराजच्या शाळेत जाऊन त्याने जबरदस्तीने पळून नेले. यावेळी शाळेतील शिक्षकांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्याने शिवराजला घेऊन पलायन केले.

संतोष याने मुलगा शिवराज याला भुईंज येथे आणले. तोपर्यंत शिक्षकांनी वैशाली भिंगारे यांना या घटनेची माहिती दिली. पतीने तुमच्या मुलाचा नेले आहे. पत्नी वैशाली यांनी या घटनेची माहिती कडेगाव पोलिसांना दिली. पित्याने मुलाला भुईंजमध्ये आणल्यानंतर, त्याने मुलगा शिवराज याला विष पाजले व त्याने स्वत: पिऊन फोन करून तशी माहिती पत्नीला दिली. दरम्यान, दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .

मात्र, शिवराज याची प्रकृती चिंताजनक असतानाच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूनंतर भुईंज पोलिस ठाण्यात वैशाली भिंगारे यांनी खुनाची तक्रार दिली. भुईंज पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला. संतोष भिंगारेची प्रकृती चांगली झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने संतोष भिंगारे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड.नितीन मुके यांनी काम पाहिले.