शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

आयुष्यातील महामॅरेथॉन अर्धवटच राहिली; साताऱ्यातील पत्रकार पांडुरंग पवार यांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:08 PM

सातारा : सातारा-लोणंद मार्गावर जरंडेश्वर नाका परिसरात भिक्षेकरी गृहाजवळ झालेल्या भीषण अपघातात पत्रकार व साताºयातील उत्कृष्ट मॅरेथॉनपटू पांडुरंग नामदेव ...

सातारा : सातारा-लोणंद मार्गावर जरंडेश्वर नाका परिसरात भिक्षेकरी गृहाजवळ झालेल्या भीषण अपघातात पत्रकार व साताºयातील उत्कृष्ट मॅरेथॉनपटू पांडुरंग नामदेव पवार (वय ४३ रा. धावडशी, ता. सातारा, सध्या रा. गुरुवार पेठ, सातारा) यांचा दुर्दैवी मत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, राजेंद्र गायकवाड (वय ४६, रा. दौलतनगर, सातारा) आणि पत्रकार पांडुरंग पवार हे दोघे दुचाकीवरून नागेवाडी येथून रात्री पावणेबाराच्या सुमारास साताºयात येत होते. यावेळी राजेंद्र गायकवाड हे दुचाकी चालवत होते तर पांडुरंग पवार हे पाठीमागे बसले होते. जुना आरटीओ चौकापासून जवळ असलेल्या पुरुष भिक्षेकरी गृहासमोर आल्यानंतर समोरून आलेल्या कारने (एमएच ०३ बीएच ४१०४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. याचदरम्यान पाठीमागे असणाºया दुसºया कारची (एमएच ११ व्हीव्ही ७१९३) अपघातग्रस्त कारला धडक बसली. या अपघातामध्ये दुचाकीवरील राजेंद्र गायकवाड आणि पत्रकार पांडुरंग पवार हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पांडुरंग पवार यांना पुढील उपचारासाठी तत्काळ साताºयातील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पवार यांचा मृत्यू झाल्याचे समजताच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांसह पत्रकार यांच्यासह सातारा शहर पत्रकार संघ आणि तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी रुग्णालयात धाव घेतली. पवार यांचे सहकारी राजेंद्र गायकवाड हेही या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पत्रकार पांडुरंग पवार यांच्या अपघाती निधनामुळे साताºयाच्या पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. २० वर्षांपूर्वी धावडशी या आपल्या गावातूनच त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. विविध दैनिकातून ग्रामीण भागातील समस्या मांडून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले. धडपडी व हरहुन्नरी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी मॅरेथॉन स्पर्धेतही चुणूक दाखवली होती. पांडुरंग पवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.दरम्यान, कारचालक मंगेश मोहन पवार (रा. शिवथर, ता. सातारा) याच्यावर निष्काळीजीपणा केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करत आहेत.