शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

‘एलईडीं’च्या प्रकाशात उजळले कातरखटाव!

By admin | Published: October 15, 2015 10:49 PM

सामाजिक बांधिलकी : सावली फाउंडेशनने लाखो रुपये खर्चून चौकाचौकात उभारले टॉवर -- गूड न्यूज

विठ्ठल नलवडे - कातरखटाव--शहरातील झगमगाट, रात्रीच्या वेळी पथदिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालेले रस्ते, हे चित्र आपल्याही गावात निर्माण व्हावे, असे स्वप्न प्रत्येक गावकऱ्यांच्या मनात असतं. कातरखटाववासीयांच्या मनात असलेलं हे स्वप्न सत्यात उतरवलंय सावली फाउंडेशनने. संस्थेनं स्वखर्चातून १९ लाख रुपये खर्चून गावातील चौकाचौकात उभारलेल्या एलईडी पथदिव्यांमुळं अख्खं गाव प्रकाशानं उजळून निघालंय.गेल्या चाळीस वर्षांपासून अंधारमय असलेल्या कातरखटाव गावाला झळाळी देण्याचे काम येथील सावली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व सरपंच तानाजी बागल यांनी विधायक कार्यातून केले आहे. कोणतेही सत्ता नसताना लाखो रूपये खर्चून विकासकाम मार्गी लावली आहेत. बसस्टॉप ते जानाई चौक या मार्गावर नव्याने बसविण्यात आलेले एलईडी दिवे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले असून कातरखटाव व परिसरातील लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. गेली पंधरा दिवस कातरखटाव मुख्य चौक, मारूती मंदिर, शिवाजी चौक, कुंभार चौक, जानाई चौक, मातंगवस्ती, मानेवाडी, तुपेवाडी येथे बसविण्यात आलेल्या पथदिव्यांमुळे कातरखटाव गावाला झळाळी मिळाली आहे. सर्वांना बरोबर घेऊन तानाजी बागल काम करत आहेत. गावाला बसस्टॉप कुठे आहे माहीत नव्हते. कातरखटाव, शिंगाडवाडी, रानमळा या बसथांब्यावर रखरखत्या उन्हात शाळेतील मुले, ज्येष्ठ नागरिकांना उभे रहायला जागा नव्हती. तिथे पिकअप शेड उभारण्यात आली. संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. वाड्यावस्त्यावरील रस्त्याचे काम, तसेच आठवड्यातून एकदा दवाखान्याची गाडी सुरू करण्यात आली असून यामध्ये रूग्णासाठी मोफत उपचाराची सोय सावली संस्थेतर्फे करण्यात आली आहे. गावातील जुन्या हातपंपावर नवीन पाईप वाढविण्यात आल्या असून आजूबाजूच्या खेड्यापाड्यात लाखो रूपयांची विकासकामे सावली फाउंडेशन संस्थेतर्फे मार्गी लावण्यात आली आहेत. संस्थेच्या सामाजिक कार्याचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. खटाव तालुक्यातील पहिलाच उपक्रमएखाद्या गावात एलईडी पथदिवे बसविण्याचा तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. गावातील चौका-चौकात लावलेल्या पथदिव्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांची बालगोपाळांबरोबर वर्दळ वाढू लागली आहे. या पथदिव्यामुळे नागरिकांना एक वेगळी अनुभूती येत असून गावागावात, खेड्यापाड्यात पथदिव्याची जोरात चर्चा चालू आहे.गावासाठी पदरमोड करणारज्याला खरच गावचा विकास करायचा आहे. त्याला सत्ताच हातात पाहिजे असे नाही. ज्यांना विकासच करायचा नाही, त्यांना पळवाटा भरपूर आहेत. माझ्याकडे सत्ता असो किंवा नसो, वेळ पडेल तिथे पदरमोड करून गावाचा विकास करणार.- तानाजी बागल, सरपंच, कातरखटाव