शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

थकबाकीदारांची यादी आता फलकावर

By admin | Published: January 29, 2015 9:39 PM

पिंपोडे बुद्रुक ग्रामसभा : ‘जलयुक्त शिवार’ यशस्वी करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

पिंपोडे बुद्रुक : राज्य शासनाने सुरू केलेले ‘जलयुक्त शिवार’ अभियान यशस्वी करण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या कर थकबाकीदारांची यादी फलकवर लावण्याचा ठरावही पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामसभेत एकमताने मांडण्यात आला.सरपंच मच्छिंद्र केंजळे यांच्या अध्यक्षतेखाळी पार पडलेल्या या सभेत पंचायत समिती सदस्य अशोकराव लेंभे, भाजपचे कोरेगाव तालुकाध्यक्ष पिसाळ, रिपाइंचे तालुकाध्यक्ष नरेंद्र वाघांबरे आदींसह ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीलाच ‘अंत्यविधीसाठी केवळ एक लिटर रॉकेल मिळत असल्याची तक्रार बाबूराव काकडे यांनी केली. त्यावेळी स्वस्त धान्य दुकान चालक गजानन महाजन यांनी रॉकेल पुरवठा कमी होत असल्याचे सांगितले. शेवटी अंत्यविधीसाठी रॉकेलचा स्वतंत्र साठा राखून ठेवण्यात यावा, असा ठराव सभेत करण्यात आला.अन्नसुरक्षा योजनेपासून अनेक कुटुंब वंचित आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे,’ असे मत संजय साळुंखे यांनी व्यक्त केले. त्यावर दि. ५ फेब्रुवारीपर्यंत ग्रामपंचायतीकडे नावे नोंदविण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने यांनी सांगितले. तलाठी सुहास सोनावणे यांनी नवीन नावांचा प्रस्ताव तातडीने महसूल विभागाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. ‘गणेश मंदिर येथे अंगणवाडी परिसरात काही ग्रामस्थ कचरा टाकत असल्याने मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर वसना नदीवरील सोमनाथ मंदिरालगतच्या बंधऱ्यातील गाळ काढण्यासाठी तेथील लाभार्थी शेतकऱ्यांनी लोकवर्गणी जमा करावी,’ असे आवाहन श्याम कुलकर्णी यांनी यावेळी केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्या दिव्या पिसाळ, वनिता निकम, त्रिवेणी गार्डी, वैशाली गार्डी, जयश्री गार्डी, कौशल्या गार्डी, कार्तिकी वाघांबरे, सचिन साळुंखे, लक्ष्मण साळुंखे, प्रफुल्ल लेंभे यांच्यासह शांताराम निकम, महेश माहोटकर, पुरुषोत्तम लेंभे, संजीव साळुंखे, सूर्यकांत निकम, रेवणसिद्ध महाजन, प्रमोद खराडे, प्रमोद कदम उद्धव निकम, सुधीर साळुंखे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी माने यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)कर वसुलीसाठी गावात पिटणार दवंडीग्रामपंचायतीला महसूलकरांपैकी केवळ सात लाख रुपये वसूल झाल्यामुळे एकूण कर २५ लाख रुपये असून, वसुलींच्या कामात ग्रामस्थांनी सहकार्य न केल्यामुळे पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत गावाचा समावेश होऊ शकला नाही. त्यामुळे सहा लाखांचे शासकीय अनुदान मिळू शकले नसल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी माने यांनी दिली. त्यावर गावात दवंडी देऊन कर भरणा करण्याचे आवाहन करण्याचे ठरले. दि. १० फेब्रुवारीपर्यंत कर जमा न केल्यास थकबाकीदारांची यादी फलकावर लावण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.