शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

स्थानिक कर्मचारी तिकीट विक्रीत मग्न!

By admin | Published: May 01, 2017 12:03 AM

स्थानिक कर्मचारी तिकीट विक्रीत मग्न!

कोरेगाव : परिविक्षाधीन अधिकारी रागसुधा रामचंद्रन यांनी एका महिन्यातच सर्जिकल स्ट्राईक करत अवैध धंद्ये बंद पाडले आहेत. पोलिस मुख्यालयातील नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेत सिंगम पद्धतीने त्यांनी कारवाईचे सत्र हाती घेतले आहे. एकीकडे ही कारवाई सुरू असली तरी पोलिस ठाण्याचा क्राईम रेट मात्र भलताच वाढला आहे. स्थानिक कर्मचारी पोलिस कल्याण निधीच्या कार्यक्रमाची तिकिटे विकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न भलताच निर्माण झाला आहे. रागसुधा रामचंद्रन यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच स्थानिक पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांना तातडीने बदलण्यात आले. त्यापाठोपाठ त्यांच्याकडे शिरवळ पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला. अप्पा कुंभार नावाच्या सहायक पोलीस निरीक्षकांना कोरेगावात धाडण्यात आले असून, त्यांची सेवा केवळ दोन ते अडीच महिने शिल्लक आहे. त्यांच्या जोडीला तीन उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी असून, दोनजण रजेवर आहेत. एक महिला उपनिरीक्षक कर्तव्यावर हजर आहेत. रागसुधा रामचंद्रन यांनी पोलिस मुख्यालयातील विशेष पथकाद्वारे सिंगम स्टाईलने कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या कारवाईत स्थानिक पोलिस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतले जात नाही. (प्रतिनिधी) गुन्ह्यांची संख्या वाढली...एकीकडे कारवाईचा धडाका सुरू असतानाच पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. खुनाच्या प्रयत्नांचे तीन गुन्हे, एक बाललैंगिक अत्याचारासह अ‍ॅट्रॉसिटीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयित गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले आहेत. त्यापैकी चिमणगावच्या गुन्ह्यातील संशयितांचे जिल्हा न्यायालयात जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काही केल्या ते पोलिसांच्या हाती लागत नाहीत. अवैध धंद्यांवर कारवाई सुरू ठेवतानाच कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी काम करणे अभिप्रेत आहे. मात्र कोरेगावात वेगळेच घडत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी याविषयात लक्ष घालण्याची गरज निर्माण झालेली आहे. कर्मचाऱ्यांना जबाबदारी...सातारारोड दूरक्षेत्रासह स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवैध धंद्यांवरील कारवाईपासून अलिप्त ठेवले जात आहे. त्यांच्यावर पोलिस कल्याण निधीच्या मदतीसाठी दि. २ मे रोजी साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर आयोजित केलेल्या ‘मराठी तारका’ या संगीतमय कार्यक्रमांची सुमारे पाच लाख रुपये किमतीची तिकिटे विकण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रत्येक बिटनुसार कर्मचाऱ्यांना अंतर्गत जबाबदारीचे वाटप करण्यात आले असून, जवळपास ४० टक्के जबाबदारी पूर्णत्वाकडे गेली आहे.