खटाव : कोरोनाचे संक्रमनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, तसेच खटाव गावात कोरोना रुग्ण संख्या वाढायला लागली आहे. त्यामुळे २८ एप्रिल ते ६ मे या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे.
याबाबत खटाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सदस्य, तसेच ग्रामदक्षता समिती सदस्यांची बैठक झाली. यामध्ये खटावमधील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, ग्रामविकास अधिकारी विकास चव्हाण, राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक कुदळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडगे, वैभव वाघ, नवनाथ शिंदे, अशोक भूप उपस्थित होते.
खटाव हॉटस्पॉट बनू लागला आहे. ऑक्सिजन बेडची तर परिस्थिती महाभयंकर आहे, म्हणून कठोर पाऊल म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने गावात कडकडीत बंद पाळला. बुधवार, दि. २८ पासून सुरू होणाऱ्या या बंदमध्ये नऊ दिवस बँकांसहित सर्व व्यवहार बंद राहील. केवळ मेडिकल दुकाने सुरू राहतील, अशी माहिती सरपंच नंदकुमार वायदंडे यांनी सांगितली.