शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
3
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
4
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
5
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
6
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
7
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
8
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
9
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
10
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
11
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
12
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
14
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
15
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
16
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
17
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
18
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
19
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

Lok Sabha Election 2019 बेरजेच्या राजकारणात काँग्रेस मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 10:44 PM

दशरथ ननावरे । लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात विधानसभेची चाचपणी सुरू झाली आहे. विविध पक्षांच्या बड्या ...

दशरथ ननावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात विधानसभेची चाचपणी सुरू झाली आहे. विविध पक्षांच्या बड्या नेत्यांची उड्डाणे सुरू असताना विधानसभेच्या प्रत्येक मतदार संघातही याचे पडसाद उमटू लागले आहेत. वाई विधानसभेच्या पटलांवरही ही स्थित्यंतरे दिसून येत आहेत. भाजपा, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांनी बेरजेचे राजकारण सुरू करीत बळ वाढविण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. बेरजेच्या राजकारणात काँग्रेसची वजाबाकी होताना दिसते.लोकसभेच्या प्रार्श्वभूमीवर राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडल्या आहेत. दोनच महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन सेनापती बनलेल्या फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपाच्या वाहत्या गंगेत झेप घेतली. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांच्या हाताला आधार उरला नसल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे. वाई मतदार संघात विधानसभेचे लक्ष्य ठेवून माजी आमदार मदन भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रीय कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हवालदिल झाल्याने पक्षाचे भवितव्य धोक्यात आले असल्याची चर्चा आहे. त्यातच वाई खंडाळ्यातील दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी भाजपाचा मंत्रोच्चार सुरू केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या किल्ल्याचे बुरुज ढासळू लागले आहेत.वाई तालुक्यातील भुर्इंज गटातून काँग्रेसकडून जिल्हा परिषद लढलेले प्रकाश दुरगुडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आमदार मकरंद पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश करून कार्यकर्त्यांना वाट मोकळी करून दिली. खंडाळा तालुक्यातील काँग्रेसची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. वास्तविक जिल्हा परिषद निवडणुकांपासूनच काँग्रेसने मैदान सोडल्याने अनेकांनी राष्ट्रवादीचा आश्रय घेतला. त्यानंतर आमदार मकरंद पाटील यांच्या संपर्कात असलेले सगळेच काँग्रेसजण राष्ट्रवादीकडे वळले.मध्यंतरी भादे गटातील एका गावात झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तर कॉँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आता कॉँग्रेसला वाली उरला नसल्याचाच संदेश दिला. या कार्यक्रमातून मकरंद पाटील यांनी आपले स्थान मजबूत असल्याचे स्पष्ट करीत राष्ट्रवादीच्या नाराजांनाही चांगलीच चपराक दिली.वाई मतदार संघात विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आबा, दादांनी जनसंपर्क वाढवून लोकसभेच्या मैदानातच पेरणी सुरू केली. एकीकडे राष्ट्रवादी आणि भाजपाने इनकमिंगची दारे उघडी ठेवून बेरीज साधली आहे; मात्र दुसरीकडे काँग्रेसला आऊटगोर्इंग रोखता न आल्याने पक्षाची वजाबाकी सुरू आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक