सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये प्रतिसरकारमधील क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, प्रतापराव भोसले यांनी राज्याचे नेतृत्व केले. या मतदार संघावर सन १९५७ मध्ये कम्युनिस्ट पार्टी व १९९६ मध्ये शिवसेना असा अपवाद वगळल्यास काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. सन १९७७ मध्ये यशवंतराव चव्हाणांनी भारतीय लोकशाही दलाच्या नितीन लावंघरे यांचा १ लाख ९९ हजार ६०१ मतांनी पराभव केला. हा विक्रम सन १९८९ मध्ये प्रतापराव भोसलेंनी तर २०१४ मध्ये उदयनराजेंनी नवीन विक्रम केला.कोणाला किती होते मताधिक्यवर्ष नाव मताधिक्य1951 गणेश आळतेकर 37,2241957 नाना पाटील 68,4491962 किसन वीर 1,03,6911967 यशवंतराव चव्हाण 1,27,8361971 यशवंतराव चव्हाण 1,76,8301977 यशवंतराव चव्हाण 1,91,6011980 यशवंतराव चव्हाण 53,0331984 प्रतापराव भोसले 95,5201989 प्रतापराव भोसले 3,16,9911991 प्रतापराव भोसले 1,59,2121996 हिंदुराव नाईक-निंबाळकर 11,8091998 अभयसिंहराजे भोसले 1,81,4761999 लक्ष्मणराव पाटील 1,24,7712004 लक्ष्मणराव पाटील 3,9572009 उदयनराजे भोसले 2,97,5152014 उदयनराजे भोसले 3,66,5943,66,594एवढ्या मताधिक्याने उदयनराजे भोसले यांना २०१४ मध्ये विजय मिळाला होता. त्यावेळी त्यांना ५,२२,१५३ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर व अपक्ष पुरुषोत्तम जाधव उभे होते. त्यांना १,५५,९३७ मते मिळाली होती. त्यावेळी त्यांचा ३ लाख ६६ हजार ५९४ मताधिक्याने पराभव झाला होता. हा रेकॉर्ड अबाधित आहे.
Lok Sabha Election 2019 साडेतीन लाखांच्या मताधिक्याचा रेकॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:16 PM