सागर गुजर । सातारा : लोकसभा निवडणुकीत स्थानिक बेरोजगारी, उद्योगांची सुरक्षितता आदी मुद्दे चर्चेला आले आहेत. हेच मुद्दे निवडणुकीनंतरही तितक्याच तडफेने मांडून जिल्ह्यातील बेरोजगारी हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा जिल्ह्यातील स्थानिक जनतेची आहे.
साताºयातील विविध शासकीय, खासगी आयटीआय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांतून कुशल मनुष्यबळ तयार होते. मात्र, त्यांना अपेक्षित पगाराची नोकरी मिळविण्यासाठी पुणे अथवा मुंबई गाठावी लागते. अनेकजण बेंगलोरलाही जातात, काहीजण परदेशात जाऊन नोकरी करत तिथंच स्थायिक होताना दिसतात. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. जिल्ह्यामध्ये शासकीय, निम-शासकीय तसेच खासगी अशा एकूण २ हजार १६९ संस्थांची नोंद रोजगार कार्यालयात आहे.
सातारा शहरासह इतर शहरे व गावांमध्ये सहज जरी फेरफटका मारला तरी तरुण कमी आणि वयस्कर लोकच जास्त पाहायला मिळतात. स्थानिक तरुण नोकरीनिमित्त सातारा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात गेलेला असतो. गावात अपेक्षित रोजगार मिळत नसल्याने सातारा, वाई, फलटण, शिरवळ, लोणंद, कºहाड येथील औद्योगिक वसाहतीत अल्प मोबदल्यात काम करणारे अनेक तरुण आपण पाहतो. मात्र, त्यापुढे जाऊन भविष्याचा विचार करून पुणे-मुंबईत राहून नोकरी करणाºयांची संख्या वाढली असल्याने गावे ओस पडलेली पाहायला मिळतात.
शेतीमधील उत्पादनांना हमी भाव मिळाला तर स्थानिक शहरात नोकरी करून गावातील शेतीकडेही तरुणांना लक्ष देता येईल, मात्र तसे होत नाही. लोकप्रतिनिधींनी या समस्या ओळखून योजनांची अंमलबजावणी करावी, अशी तरुणांची अपेक्षा आहे. त्याबरोबरच उद्योजकांना सुरक्षित वातावरण मिळाले तर उद्योग वाढून रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा उद्योजकांची आहे.
बेरोजगार तरुणांना काय हवे?1 मुले-मुली तांत्रिक शिक्षण घेतात, मात्र त्यांना रोजगार देण्याच्या बाबतीत सातारा शहरात मर्यादा येताना दिसतात. त्यामुळे पुणे-मुंबईतल्या नोकºया साताºयात मिळाल्या पाहिजेत. 2 सातारा शहराच्या १६ ते २० किलोमीटर परिघात मोठे उद्योग येणे गरजेचे आहे. साताºयातील विशाल औद्योगिक वसाहतीचा विकास झाला पाहिजे.3 आयटीआय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॅम्पस इंटरव्ह्यूतून उत्तम पगाराची कायमस्वरुपी नोकरी मिळावी. उद्योजकांच्या या आहेत अपेक्षा1 उद्योजकांना सुरक्षित वातावरण असणे गरजेचे आहे. खंडणीखोर लोकांवर पोलीस यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधींनीही वचक ठेवावा.2 औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरुस्ती वेळच्यावेळी होणे गरजेचे आहे. आर्थिक मंदीच्या काळात कामगार आणि त्यांचे नेतृत्व करणाºयांनीही कंपनीला सहकार्य करणे गरजेचे आहे.3 तांत्रिक ज्ञान असणाºया तरुण-तरुणींना नोकरी देण्यात अडचणी येत नाहीत, कारण कामाच्या पहिल्या दिवसापासूनच हे लोक संबंधित संस्थेला फायद्याचे ठरतात.
मी आयटीआयचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला नोकरीची तत्काळ गरज होती. मात्र माझी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून पुण्यातील एका नामांकित कंपनीत निवड झाली होती. मात्र, तिथे एनसीटीव्हीटीचे एक वर्ष पूर्ण केल्यानंतर या कंपनीने मला कायम करून घेतले नाही. नाईलाजाने मला पुण्यात इतर कंपनी शोधावी लागली. साताºयात परतावे तरी माझ्या ट्रेडला येथे माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवून काही पैसे शिल्लक राहतील, एवढेही पैसे शिल्लक राहण्याइतपत पगार मिळत नाही. - संदीप पवार, बेरोजगारसाताºयात केंद्र व राज्य पुरस्कृत एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणाºया मोठ्या एलएसआय इंजिनिअरिंग उद्योगाची उभारणी झाल्यास जिल्ह्यातील छोट्या उद्योगांना काम मिळेल. इंजिनिअरिंग व शेतीमाल प्रक्रिया उद्योग म्हणून साताºयाला क्लस्टर जिल्हा म्हणून मान्यता व शेतीमाल प्रक्रिया उद्योग म्हणून साताºयाला क्लस्टर जिल्हा म्हणून मान्यता दिल्यास शेतकºयांना एकत्र घेऊन शेतीमालाच्या दराचा विषय कायमचा मिटू शकतो. मासच्या माध्यमातून कचरा प्रक्रिया उद्योग, उद्योगांना निर्यातक्षम उत्पादन करण्यासाठी तसेच प्रॉडक्ट डिझाइन व टेस्टींग कामन फॅसिलीटी सेंटर करणे गरजेचे आहे. तसेच मोठे उद्योग सातारमध्ये यावेत, त्यासाठी त्यांना जागा उपलब्ध व्हायला हवी, त्यांना पोषक वातावरणही हवे.- राजेंद्र रानडे, अध्यक्ष, मास