प्रमोद सुकरे ।कºहाड : ‘नाती जोडावीही लागत नाहीत अन् तोडावीही लागत नाहीत. ती आपोआप जोडली जातात अन् आपोआप तुटलीही जातात,’ असं म्हटलं जातं. याचीच प्रचिती सध्या साताऱ्याच्या राजकारणात येत आहे. काल परवापर्यंत साताºयाच्या दोन राजांतील टोकाचा संघर्ष आता एकमेकांना मिठ्या मारत मिटल्याचे पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे माथाडी नेते नरेंद्र अन् रमेश पाटील यांच्यात मात्र चांगलंच फाटल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याची चर्चा झाली नाही तर नवलच!
राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो, याचा अनुभव अनेकदा पाहायला मिळतोय. अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर गत विधानसभेला काँगे्रस-राष्ट्रवादी, भाजप-सेना यांनी एकमेकांवर तोंडसुख घेऊन स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती अन् आघाडीच्या नावाखाली त्यांनी गळ्यात गळे घातल्याचे पाहायला मिळतेच आहे ना? पक्षीय पातळीवर घडणाºया घडामोडी व्यक्तिगत पातळीवरही पाहायला मिळणारच!
राजघराण्यातील दोन भावांचे मनोमिलन तर कधी घडेल अन् कधी बिघडेल, हे सांगता येत नाही. ‘सारे कळत नकळतच घडते’ याची सातारकरांना सारखीच अनुभूती येते. आता गत विधानसभा-लोकसभेला एकत्र असणाºया दोन राजांच्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीला बिघडले. त्यावेळपासून दोन्ही राजांच्यात अन् समर्थकांच्यात काय ‘राडा’ झाला आहे, हे सर्वश्रूत आहे.लोकसभा निवडणुकीच्या अगोदर थोरल्या पवारांच्या कानपिचक्यांनी दोन्ही राजांच्या संघर्षाचे ‘पेल्यातील वादळ पेल्यातच संपले.
’ जावळी परिसरात प्रचार मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या साक्षीने परस्परांना मिठी मारल्याने राजेंच्यातील मिटलं, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.दुसरीकडे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सातारा लोकसभा मतदार संघातून लढण्यासाठी ‘शिवधनुष्य’ उचलला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँगे्रसच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे सदस्य असणारे रमेश पाटील हे बंधू आज भावाबरोबर दिसत नाहीत.मिसळ खाल्ली; पण...गत महिन्यात नरेंद्र पाटील यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबरोबर साताºयात एका हॉटेलमध्ये एकत्रित मिसळ खाल्ली होती; पण लगेचच काही दिवसांत खासदार उदयनराजे भोसले यांनी ढेबेवाडी (पाटण) येथे रमेश पाटील यांच्या घरी स्नेहभोजन घेऊन काटशह दिला होता. त्यावेळपासूनच उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटील अशी लढत झाली तर रमेश पाटलांचे काय, अशी चर्चा होती.
तांत्रिक अडचण की मनापासून मदतदोन्ही राजांच्यात मिटले असले तरी तो तह आहे की मनोमिलन! हा संशोधनाचाच भाग आहे. शिवेंद्रसिंहराजे पक्षादेश मानत आहेत की भावासाठी प्रचार करीत आहेत, हे आज सांगणे कठीण. त्यापद्धतीने राष्ट्रवादीतून जिल्हा परिषद सदस्य झालेले रमेश पाटील हे पक्षादेश मानत आहेत की शिवसेनेतून उभे राहिलेले बंधू नरेंद्र पाटील यांना विरोध करीत आहेत, हे सांगणेही कठीण! हे दोन्ही भाऊ तांत्रिक अडचणीमुळे की मनापासून निर्णय घेताहेत, याचा शोध घ्यावा लागेल.