कोरेगाव : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने स्थापनेपासून लोकसेवा करण्यात धन्यता मानली आहे. केवळ वृत्तपत्र म्हणून काम न करता, समाजाची संपूर्ण जबाबदारी ‘लोकमत’ने उचलली आहे,’ असे प्रतिपादन प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले.
स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्रभर ‘लोकमत रक्ताचं नातं’ अभियान सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरेगाव येथील हुतात्मा स्मारक (रोटरी उद्यान) येथे झालेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन दीपप्रज्वलनाने झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, तहसीलदार अमोल कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. नीलेश दबडे, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अभिजित महामुनी, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, ज्येष्ठ पत्रकार विलास शहा, धोम धरण कृती समितीचे निमंत्रक मनोहर वाघ यांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, मनोगतामध्ये मान्यवरांनी ‘लोकमत’ने हाती घेतलेली रक्तदानाची चळवळ राज्यात निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिबिरामध्ये ३६ जणांनी रक्तदान केले.
रक्तदाते..
‘ए’ पॉझिटिव्ह रक्तगट दाते : साहिल शहा, माधुरी गांधी, सावन पंडित, अनिल पवार, गणेश बकरे, जितेंद्र जगदाळे, असिफ कुरेशी.
‘ए’ निगेटिव्ह रक्तगट दाते : कुमार शिंदे, सागर निकम, शशिकांत निकम.
‘बी’ पॉझिटिव्ह रक्तगट दाते : आकाश शेट्टी, अभिजित महामुनी, प्रीतम झांजुर्णे, कृष्णात शिंदे, श्रीधर नामदास.
‘एबी’ पॉझिटिव्ह रक्तगट दाते : अतुल केंजळे, नंदकुमार घोलप, करण पंडित.
‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगट दाते : डॉ. युवराज करपे, राजेंद्र तरडेकर, सुनील साळुंखे, विक्रम जगदाळे, सुजित गांधी, महेश सुतार, दुर्वा कापसे, शहनवाज बागवान, पंकज गोडसे, राजेंद्र शिंदे, महेश कुलकर्णी, अक्षय जाधव, आकाश गवळी, सतीश माने, निखिल बनसोडे, वैभव जगदाळे, किरण रोमण, साहिल सय्यद.
फोटोनेम : कोरेगाव रक्तदान २. जेपीजी.
फोटो ओळ : दीपप्रज्वलनप्रसंगी प्रांताधिकारी ज्योती पाटील, शेजारी तहसीलदार अमोल कदम, ‘लोकमत’चे जाहिरात उपव्यवस्थापक संतोष जाधव, तालुका प्रतिनिधी साहिल शहा, संजय कदम, राजाभाऊ बर्गे, विलास शहा, मनोहर वाघ आदी उपस्थित होते.