संदीप कुंभार।मायणी : ‘लोकमत’च्या विविध सदरांमधून वेळोवेळी प्रकाशित होणाऱ्या वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आशयाची माहिती संग्रह मायणी, ता. खटाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानकात्रे येथील उपशिक्षक बाळासाहेब कांबळे यांनी सुमारे दीडशे पानांची पुस्तिका तयार केली आहे.‘लोकमत’मधून प्रत्येक दिवशी व ‘संस्काराचे मोती’सारख्या उपक्रमातून विविध महत्त्वपूर्ण गोष्टीवर लेख प्रसिद्ध केले जातात. यातून अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या ज्ञानात व माहितीमध्ये भर पडलेली आहे. अशाच आशयाची महत्त्वपूर्ण माहितीची विविध कात्रणांचा संग्रह केले आहे.यामध्ये विविध राजकीय, ऐतिहासिक, साहित्यिक, सामाजिक व्यक्तींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना, गोष्टी, घडामोडी यावर आधारित ‘प्रेरणा’ नावाचे सदर ‘लोकमत’मधून यापूर्वी प्रकाशित होत होते. नेमक्या आणि मोजक्या शब्दात या सदरात विविध मान्यवर व्यक्तींचा परिचय दिलेला होता.यामध्ये लुई ब्रेल, आईनस्टाईन, हुतात्मा अनंत कान्हेरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मेरी क्युरी, वि. का. राजवाडे, बहिणाबाई चौधरी, सरोजिनी नायडू, ह. ना. आपटे, पट्टे बापूराव, धनंजय कीर, शंकरराव खरात, मल्हारराव होळकर अशा सुमारे दीडशेच्या आसपास व्यक्तींच्या प्रेरणा सदरातून वाचकांना भेटत. मुलांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून पालक नेहमी संस्कारा संदर्भातील किंवा मूल्यवर्धन संदर्भातील पुस्तके मुलांच्या हातात देतात.लेखांचा मजकू र मुलांसाठी उपयुक्तअनेकवेळा विविध चांगल्या गोष्टी वाचण्यात येतात. मात्र, काही कालांतराने त्या विस्मरण होतात. अशा चांगल्या वाचनीय गोष्टी कायम स्मरणात असाव्यात व त्याचा संग्रह असावा. यासाठी ‘प्रेरणा’ नावाचे हे पुस्तक तयार केले आहे. याचबरोबर सत्तरच्या आसपास बोधकथा आणि काही रंजनमालेतून वाचकाची ज्ञानवृद्धी होत आहे. त्याच आशयाशी संबंधितअसे हे पुस्तक असून, यामुळे मुलांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. यामध्ये विविध राजकीय घडामोडींवर आधारित ‘प्रेरणा’ नावाचे सदर ‘लोकमत’मधून यापूर्वी प्रकाशित होत होते. संस्काराचे मोतीसारख्या उपक्रमातून विविध महत्त्वपूर्ण गोष्टीवर लेख प्रसिद्ध केले जात. या लेखांचा संग्रह करून मुलांच्या उपयुक्त असा मजकूर आहे.‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’यासाठी ही पुस्तिका जुन्या टाकाऊ ‘बाड’वरती तयार केली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोºया किंवा जाड कागदांचा वापर केलेला नाही. यामध्ये ‘लोकमत’ पेपरमध्ये छापून आलेल्या लेख, बोधकथा हे कापून त्याचे पे्ररणा हे प्रस्तिका तयार केली आहे. तसेच या पुस्तका अनेक थोर मोठ्या व्यक्तींचे लेख आहेत.- बाळासाहेब कांबळे,प्राथमिक शिक्षक, मायणी
‘लोकमत’च्या कात्रण संग्रहातून बनवली ‘‘प्रेरणा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 1:19 AM
‘लोकमत’च्या विविध सदरांमधून वेळोवेळी प्रकाशित होणाऱ्या वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आशयाची माहिती संग्रह मायणी, ता. खटाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानकात्रे येथील
ठळक मुद्दे कानकात्रेमधील बाळासाहेब कांबळे यांचा उपक्रम । सामाजिक, ऐतिहासिक आशयाची संग्रहातून दीडशे पानांची पुस्तिका