लोणंद : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत लोणंद येथे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कचरे फ्रॅक्चर ॲण्ड ॲक्सिडेंट हॉस्पिटल व अक्षय ब्लड बँक सातारा यांचे सहकार्याने हे शिबिर पार पडले.
राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवला असून तो दूर करण्यासाठी ‘लोकमत’ ने एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. लोणंद येथे पार पडलेल्या शिबिरात लोणंदवासीयांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन स्वामी सेवा उपक्रमाचे सदस्य किशोर दोशी यांनी केले.
लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शेळके, गजेंद्र मुसळे, सागर शेळके, डॉ. डोंबाळे, हर्षवर्धन शेळके व मान्यवरांनी देखील रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी
किशोर दोशी, वैभव घोरपडे, अभिजीत पंडित, ऋषिकेश हिंगमिरे, सागर घोडके, संतोष रोकडे यांनी परिश्रम घेतले.
फोटो : २० संतोष खरात