शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

घराच्या खिडकीकडे पाहत पिस्तूल रोखले; कोंडवेतील घटना, तीन तरुणांना अटक

By दत्ता यादव | Published: August 31, 2023 7:39 PM

दि. ३० रोजी रात्री पठाण यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

सातारा : कोंडवे, ता. सातारा येथील व्यावसायिक कादर बशीर पठाण (वय ३८) यांच्या घराच्या खिडकीकडे पिस्तूल रोखून कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या तिघांना सातारा तालुका पोलिसांनी तातडीने अटक केली. ही घटना दि. २७ रोजी रात्री सव्वादहा वाजता घडली होती.

अश्पाक मुबारक शेख (वय २१, रा. राजसपुरा पेठ, सातारा), मोहनीश चंद कुरेशी (वय २३, रा. शुक्रवार पेठ, सातारा), मेहताब जब्बार शेख (वय २१, रा. केसरकर पेठ, सातारा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कादर पठाण हे स्क्रॅप व्यावसायिक असून, ते कोंडवे येथील मायगोल्ड कंपनीच्या पाठीमागे राहतात. दि. २७ रोजी रात्री १०ः१५ च्या सुमारास वरील संशयित हे त्यांच्या घराजवळ गेले. अश्पाक आणि मोहनीश याने त्यांच्या खिडकीकडे पाहत पिस्तूल रोखून धरले. त्यामुळे पठाण यांच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला. हा सारा प्रकार पठाण यांच्या घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

त्यानंतर बुधवार, दि. ३० रोजी रात्री पठाण यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू शिखरे यांनी तातडीने वरील तीन संशयितांना अटक केली. न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, नेमक्या कोणत्या कारणातून हा प्रकार घडला, हे अद्याप समोर आले नसून, संशयित आरोपींकडे पोलिस कसून चाैकशी करीत आहेत.