आदर्की : फलटण पश्चिम भागात गौणखनिजाचे उत्खनन करून वाळू, मुरमाची लाखो रुपयांचे महसुली उत्पादन बुडवून रात्रंदिवस चोरटी वाहतूक सुरू असूनही महसूल विभाग गांधारीची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
फलटण पश्चिम भागात आदर्की महसुली मंडळात एका तलाठ्याकडे एक ते चार गावे आहेत.
त्यामुळे गौनखनिज उत्खननाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण दररोज वाळूची वाहतूक रात्रंदिवस होत आहे. बहुतांश रस्त्यावर वाळू पडलेली दिसत आहे. गतवर्षी व यावर्षी पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे तलाव, बंधारे यांमध्ये पाणीसाठा होता तर ओढ्यांना पाणी वाहत असल्याने वाळू उपसा बंद होता. आता पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये महसुली उत्पन्न बुडत आहे. त्याप्रमाणे जमीन सपाटीकरणाच्या नावाखाली
मुरमाची वाहतूक सुरू असते तरी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी भरारी पथकाची नेमणूक करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
१८आदर्की
फोटो -फलटण पश्चिम भागात गौणखनिज वाहतूक व
उपसा होत आहे.