सातारा : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सातारा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. तसेच मायणीसह अनेक गावांमध्ये भाजपने निर्विवाद सत्ता हस्तगत केली. मायणीत सतरापैकी दहा जागा दिलीप येळगावकर - सचिन गुदगे गटाने पटकावल्या . दरम्यान, सातारा तालुक्यातील सोनगाव, जकातवाडी अन् कोपर्डेसह काही गावांमध्ये खासदार उदयनराजे भोसले गटाचा झेंडा फडकला. वडूथमध्ये जिल्हा परिषदेच्या सभापती वनिता गोरे यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला असून म्हसवे गावात संजय शेलार केवळ तीन मतांनी विजयी झाले. क्षेत्रमाहुलीत सत्तांतर झाले असून राष्ट्रवादीच्या शिवेंद्रराजे अन् शशिकांत शिंदे गटाला आठ तर भाजपच्या संतोष जाधव गटाला सहा जागा मिळाल्या आहेत. अपशिंगेत शिवेंद्रराजे गटाची सत्ता अबाधित राहिली असून गणेश देशमुख यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. आसनगावात बाबाराजे गट विजयी झाला असला तरी जकातवाडीमध्ये खासदार उदयनराजे गटाची सत्ता अबाधित राहिली. दरम्यान, अपशिंगेत संगिता निकम तर सोनगावला प्रभावती मुळीक यांना चिठ्ठीने तारले. कामेरीत मात्र भाजपचा सरपंच निवडून आल्याचे दिसून आले. कोरेगाव तालुक्यातील बनवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळू नलगे हे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले असून आसनगांवमध्ये अनिल शिंदे पॅनेलला ७ पैकी ४ जागा मिळाल्या. करंजखोप, रणदुल्लाबाद राष्ट्रवादीकडे तर पिपोडे खुर्द, खेड (नांद.) भाजपा अन् वाघोली काँग्रेसने जिंकली आहे. खंडाळा तालुक्यातील असवलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ यांना धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस औदयोगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ यांच्या गटाने सरपंचपदासह सात जागा जिंकल्या. वाई तालुक्यात किकली, काळंगवाडी व गोवेदिगर ही गावे भाजपकडे गेली असून भुईंज, कवठे, पांडे काँग्रेसकडे तर बोपर्डी राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली.फलटण तालुक्यात दुधेबावी, सुरवडीचे सरपंच काँग्रेसचे बनले. तसेच चौधरवाडी ,वडले, वाठार निम्बाळकर राष्टवादीकडे तर गिरवी भाजपाकडे गेली.
मायणीसह अनेक ठिकाणी कमळ फुललं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 2:06 PM
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सातारा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. तसेच मायणीसह अनेक गावांमध्ये भाजपने निर्विवाद सत्ता हस्तगत केली. मायणीत दहापैकी सात जागा दिलीप येळगावकर - सचिन गुदगे गटाने पटकावल्या.
ठळक मुद्देसातारा तालुक्यात बाबा राजेंची दिवाळी !सोनगाव-जकातवाडी उदयनराजेकडे..सचिन गुदगे मायणीचे नवे सरपंच