शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

माढ्याचा खासदार प्रत्येकवेळी नवा; परंपरा अखंडित ! चारहीवेळा नवीन चेहरा; आता सोलापूरकरांच्या गळ्यात माळ

By नितीन काळेल | Published: June 06, 2024 7:09 PM

देशात २००८ मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यावेळी माढा मतदारसंघ अस्तित्वात आला.

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होऊन राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील माेहिते-पाटील भाजपवर भारी ठरले. त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर मात केली. त्यामुळे प्रत्येकवेळी नवा खासदार हे माढ्याचे समीकरण कायम राहिले. तर यावेळी सोलापूरकरांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असली तरी यापूर्वी पुणे आणि सातारकरही माढ्यातून खासदार झाले आहेत.

 देशात २००८ मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यावेळी माढा मतदारसंघ अस्तित्वात आला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, सांगोला, करमाळा आणि माळशिरस विधानसभेचे मतदारसंघ येतात. तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघांचाही समावेश होतो. २००९ मध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांना माढ्याची निवडणूक लढविण्याचा आग्रह झाला. त्यामुळे पवार माढ्यातून रिंगणात उतरले. तर विरोधात भाजपचे सुभाष देशमुख तसेच रासपचे महादेव जानकरही रिंगणात होते. त्यावेळी माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्या तुलनेत भाजपची ताकद नगण्य होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे शरद पवार यांनी तब्बल ३ लाखांहून अधिक मतांनी भाजपचा पराभव केला. पवार हे पुणे जिल्ह्यातील असले तरी माढ्याचे पहिले खासदार ठरले.२०१४ च्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीने मैदानात उतरवले. त्यावेळी राज्यात महायुती झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीचा भाग होती. त्यामुळे मतदारसंघ स्वाभिमानीला गेल्यावर सदाभाऊ खोत यांना उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत खोत यांनी जोरदार टक्कर दिली. पण त्यांचा मोहिते-पाटील यांनी २५ हजार मतांनी पराभव केला. मोहिते-पाटील दुसरे खासदार ठरले. ते सोलापूर जिल्ह्यातील अकलुजचे. २०१९ ला तिसरी निवडणूक झाली. या निवडणुकीत दोघा मित्रांत लढाई झाली. भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना, तर राष्ट्रवादीने सध्याचे करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. निवडणूक चुरशीची झाली. पण पहिल्यांदाच मतदारसंघात रणजितसिंह यांच्या रूपाने कमळ फुलले. त्यांनी शिंदे यांचा ८५ हजार मतांनी पराभव केला. रणजितसिंह हे सातारा जिल्ह्यातील फलटणचे. त्यामुळे माढ्याचा खासदार तीन निवडणुकांत वेगवेगळा झाला.

२०२४ ची माढा लोकसभेची चौथी निवडणूक होती. या निवडणुकीतही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांत सामना झाला. भाजपने अपेक्षेप्रमाणे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मैदानात उतरवले. त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रामराजे नाईक-निंबाळकर आणि अकलुजचे माेहिते-पाटील नाराज झाले. त्यांनी रणजितसिंहच्या उमेदवारीला विरोध कायम ठेवला. त्यातच भाजपमध्ये असलेले धैर्यशील मोहिते-पाटील हेही इच्छुक होते. त्यांना डावलण्यात आले. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे पाच वर्षांनंतर शरद पवार आणि मोहिते एकत्र आले. त्यातच माळशिरसमधील कट्टर विरोधक उत्तम जानकरही मोहितेंबरोबर आले. तसेच माळशिरस, करमाळा आणि माढा विधानसभा मतदारसंघांतूनही मताधिक्य मिळाले. त्यामुळे माढ्यात तुतारी वाजली आणि धैर्यशील मोहिते खासदार झाले. मोहिते यांच्यामुळे माढ्यात रणजितसिंह यांना दुसऱ्यांदा खासदार बनता आले नाही. तसेच माढा मतदारसंघाने प्रत्येकवेळी नवीन खासदार निवडून देण्याची परंपराही कायम ठेवली.

निवडणुकीत राष्ट्रवादीचा नेहमीच नवा उमेदवार...

माढा मतदारसंघातील चौथी निवडणूकही राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच झाली. आतापर्यंतच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकवेळी नवीन उमेदवार देण्यात आला आहे. यामध्ये अकलुजच्या मोहिते-पाटील घराण्यात दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. तर भाजप तसेच युतीतून पहिल्या दोन निवडणुकांत वेगवेगळे उमेदवार देण्यात आले. तर तिसऱ्या निवडणुकीत विजयी झालेले खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर भाजपने आताच्या चाैथ्या निवडणुकीतही विश्वास दाखविला. पण, आताच्या या निवडणुकीत राजकीय समीकरणे खूप बदलली. त्यामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. रणजितसिंह यांच्या उमेदवारीला विरोध होत असताना भाजपने विचार केला असता तर या निवडणुकीतील चित्र वेगळेच असते. तसेच भाजप किंवा महायुतीला हा मतदारसंघ स्वत:कडे ठेवता आला असता हे निश्चित आहे.

टॅग्स :madha-acमाढा