शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

महाबळेश्वरात ‘आबा-बापूं’चं गुफ्तगू!

By admin | Published: February 25, 2015 11:24 PM

स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ : राजकीय गढूळ वातावरण स्वच्छ करणार की काय?

महाबळेश्वर : गेल्या अनेक दिवसांपासून महाबळेश्वरचे राजकीय वातावरण विविध कारणांवरून ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पालकमंत्री विजय शिवतारे व राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे महाबळेश्वरमधील ‘स्वच्छ सुंदर महाबळेश्वर’ या कार्यक्रमात मंगळवारी एकत्र आले. व्यासपीठावर दोघांनीही एकमेकांच्या कानात बराच वेळ गुफ्तगू केले. यामुळे हे दोन्ही नेते आता एकत्र येऊन महाबळेश्वरच्या गढूळ वातावरणाची स्वच्छता करणार की काय? अशी चर्चा होऊ लागली आहे.महाबळेश्वरमध्ये दि. २४ रोजी ‘ग्रीन महाबळेश्वर व सुंदर महाबळेश्वर’ या अभियानाचा प्रारंभ झाला. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, अभिनेते आदेश बांदेकर, आ. मकरंद पाटील, नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल यांसह मान्यवर उपस्थित होते. महाबळेश्वर पालिकेत झालेल्या सत्तांतरानंतर महाबळेश्वरमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी असो वा विरोधक. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत मात्र शहराचा विकास भरकटला आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात येथील वाहनतळाचे भूमिपूजन करण्यात आले होते. असे असताना सत्ताधाऱ्यांनी याच वाहनतळाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन सोहळा आयोजित केला. यासाठी कार्यक्रमपत्रिका छापण्यात आली होती. मात्र या पत्रिकेत पालकमंत्री विजय शिवतारे व खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने शिवसैनिकांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. अशा अनेक कारणांमुळे महाबळेश्वरच्या राजकीय वातावरण दूषित झालेले असतानाच मंगळवारच्या कार्यक्रमात मात्र पालकमंत्री विजय शिवतारे आणि आ. मकरंद पाटील एकाच व्यासपीठावर एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. यावेळी दोघांनी एकमेंकांशी बराच वेळ गुफ्तगू केले. हे गुफ्तगू नेमके कोणत्या विषयावर होते, याबाबत मात्र अनभिज्ञ असले तरी,पालकमंत्री व आमदार यांच्यातील जवळीक व चर्चेने पुढील काळात महाबळेश्वरमध्ये पसरलेले दूषित वातावरण स्वच्छ होईल, अशीच चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)पर्यटकांच्या समस्या सुटणार?महाबळेश्वरमध्ये अस्वच्छता व नियोजनाचा अभाव पर्यटकांना नेहमीच पाहावयास मिळतो. हे टाळणे सहज शक्य असताना स्थानिक प्रशासन मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. प्रवासी गाड्यांसाठी आधुनिक पद्धतीच्या सुविधा, आकर्षक दुभाजक तसेच वेण्णा लेकवरील भिंतीवर लँड स्केप, ग्रामीण रुग्णालय, वृक्षतोड, अनधिकृत बांधकाम अशा अनेक समस्यांनी महाबळेश्वर ग्रासले आले. पालकमंत्री विजय शिवतारे व आमदार मकरंद पाटील या बाबींंकडे गांभीर्याने लक्ष देतील, अशी चर्चा ही आता होऊ लागली आहे.