शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

Satara: सलग सुट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले, वाहतुकीची ठिकठिकाणी कोंडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:26 PM

महाबळेश्वर : नाताळाच्या सलग सुट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये लाखो पर्यटक दाखल झाले आहे. शनिवार, रविवार व सोमवारी नाताळची सुटी सलग आलेल्या ...

महाबळेश्वर : नाताळाच्या सलग सुट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये लाखो पर्यटक दाखल झाले आहे. शनिवार, रविवार व सोमवारी नाताळची सुटी सलग आलेल्या सुट्ट्या अन् महाबळेश्वरची गुलाबी थंडी, हिरवागार निसर्गरम्य वातावरण, मंद गारवा अशा वातावरणात महाबळेश्वर पर्यटनस्थळी पर्यटकांची चांगलीच रेलचेल पाहावयास मिळत आहे.            महाबळेश्वर पर्यटनस्थळाचा मुख्य आकर्षण वेण्णालेक नौकाविहारावर नौकाविहार करण्यासाठी लांब लांब रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. सुट्यांमुळे येणाऱ्या पर्यटकांची आवक चांगलीच वाढली आहे. गुलाबी थंडीतही पर्यटक प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडीत अडकले होते. महाबळेश्वरात पर्यटकांच्या वाहनांची कोंडी होऊ लागल्यामुळे पसरणी घाट, पाचगणी नाका, मॅप्रो गार्डन, बगीचा काॅर्नर, वेण्णालेक नाका, पंचायत समिती समोरपर्यंत वाहतुकीची ठिकठिकाणी कोंडी निर्माण झालेली दिसून येत होती.

महाबळेश्वर तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. पर्यटकांची आवक वाढल्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तर मुख्य बाजारपेठ भरगच्च भरलेली दिसून येत होती. महाबळेश्वर व पाचगणी पर्यटनस्थळी पर्यटकांचे आगमन सुरू झाले होते. मुंबई, पुणेसह विविध ठिकाणांहून पर्यटक आपल्या कुटुंबीयांसह मित्रमैत्रिणींसह धावपळीच्या-धकाधकीच्या वेळापत्रकातून निवांत वेळ काढून निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येतात. परंतु महाबळेश्वर पाचगणीमध्ये प्रवेश करताना वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. गुरेघर येथे मॅप्रो गार्डन येथे वाहनांच्या रांग लागलेली दिसून येत होती. महाबळेश्वर वेण्णालेक येथेही अशीच परिस्थिती दिसून येत होती.महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये बहुतेक पर्यटक छत्री, शाल, स्वेटर, कानटोपी घालून फिरत होते, तर काहींनी गरम कपडे खरेदी करण्याचा आनंद घेतला. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची रेलचेल असून येथील प्रसिद्ध ॲार्थर सीट पाॅइंट केट्स पॉइंट, क्षेत्र महाबळेश्वर किल्ले प्रतापगड, लॉडवीक पॉइंट, लिंगमळा धबधबा ही पर्यटनस्थळे गर्दीने गजबजली आहेत. पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत.मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेल्या नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकला ‘चौपाटी’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटक खरेदीसाठी बाजारपेठेत मुसळधार पावसात बाजारपेठेतील प्रसिद्ध चप्पल, चणे, जाम, जेली येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी, चॉकलेट फज खरेदी करत बाजारपेठेतील आकर्षक वस्तू खरेदीकडे देखील पर्यटकांचा कल असल्याचे पाहावयास मिळत आहे.महाबळेश्वरमध्ये शनिवारी रात्री बाजारपेठ परिसरातील सर्व हॉटेल फुल झालेली दिसून येत होती. यामुळे काही पर्यटकांना वाई या ठिकाणी मुक्काम करावा लागला, तर रविवारी पॉइंट फिरण्यास जाण्यासाठी नो टॅक्सी झाली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानtourismपर्यटन