महाबळेश्वर : महाबळेश्वर-वेण्णालेक या मुख्य रस्त्यावर गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची मुख्य वाहिनी फुटल्याने सुमारे वीस ते तीस फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडाले. सुमारे अर्ध्या तासानंतर प्राधिकरणाचे कर्मचारी दाखल होत पाण्याची मुख्य वाहिनी बंद केली. तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेली.
महाबळेश्वर-वेण्णालेक या मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा वेण्णालेक पंपिंग स्टेशनपासून विल्सन पॉर्इंटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेली लोखंडी पाईपलाईन गुरुवारी पुन्हा एकदा फुटल्याने सुमारे वीस ते तीस फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडाल्याचे पाहावयास मिळाले. अर्ध्या तासात सुमारे लाखो लिटर पाणी वाया गेले. मागील वर्षीही आॅक्टोबर महिन्यामध्ये तर जून महिन्यामध्ये याच ठिकाणी पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले होते. आता पुन्हा एकदा प्राधिकरणाचा निकृष्ट कामाचा दर्जा पाहण्यास मिळाला आहे. मागील दोन ते तीन महिन्यांत हीच पाईपलाईन एकाच ठिकाणी फुटत आहे. यामुळे नागरिकांमधून प्राधिकरणाच्या कामाबाबात प्रश्न निर्माण होत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दोन्ही वेळी लोखंडी पाईप वेल्डिंग करून तात्पुरत्या उपाययोजना केल्या होत्या. नववर्षात गुरुवारी सकाळी याच ठिकाणी पुन्हा एकदा पाण्याचे फवारे उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सुमारे अर्ध्या तासाने प्राधिकरणाचे कर्मचारी दाखल झाल्यानंतर पाण्याची मुख्य वाहिनी बंद करण्यात आली. तोपर्यंत लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले होते. पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाण्याचे कारंजे इतक्या उंचीवर गेले होते की हे पाणी रस्त्यावरून जाणाºया वीजवाहक तारांना स्पर्श करत होते. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.महाबळेश्वर-वेण्णालेक या मुख्य रस्त्यावर गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा जीवन प्राधिकरणाची पाण्याची मुख्य वाहिनी फुटल्याने सुमारे वीस ते तीस फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडाले.