शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

महाबळेश्वरातील खून अनैतिक संबंधातून

By admin | Published: February 14, 2016 12:43 AM

दोघे फरार : प्रेयसीसह चौघांना अटक

महाबळेश्वर : येथील लॉडविक पॉइंटच्या टेकडीवर प्रकाश पांडुरंग कराळे (वय ३५, रा. थिटे वस्ती, खराडी, पुणे) याचा झालेला खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी कराळेच्या प्रेयसीसह चौघांना अटक केली आहे. दरम्यान, प्रकाशकडून सतत मारहाण होत असल्याने कंटाळून प्रेयसीने दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने हा खुनाचा कट रचला. अटक केलेल्यांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. तर फरार दोघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणात प्रकाशची प्रेयसी सोनाली बालाजी काशीद, निखिल संतोष भाटी (वय २०), ज्योती काशिनाथ चिकणे (वय २३), मनोज काशिनाथ चिकणे (वय ३०, चौघेही रा. इंदिरानगर नं. १, नायर गणेश मंदिराजवळ, जेएन रोड, मुलुंड, मुंबई) यांना अटक केली आहे. यामधील ज्योती व मनोज हे बहीण-भाऊ महाबळेश्वर तालुक्यातील जावली या गावचे मूळ रहिवासी आहेत. तर या कटात सहभागी असणारे राहुल जयसिंग साळुंखे आणि आकाश खुशाल चव्हाण हे दोघे फरार आहेत. याबाबत महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘मृत प्रकाश पांडुरंग कराळे (वय ३५, रा. थिटे वस्ती, खराडी पुणे) हा पत्नी व चार मुलांसह राहात होता. प्रकाशच्या घराजवळच सोनाली काशीद (वय २३) ही पती व दोन मुलांसह राहात होती. सोनालीचे व पतीचे सतत भांडण होत होते. भांडणामुळे पती सोनालीला सोडून निघून गेला. पती गेल्यानंतरच्या काळात सोनालीची प्रकाशबरोबर ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या प्रेम प्रकरणाची माहिती प्रकाशच्या पत्नीलाही समजली. त्यामुळे दोघा पती-पत्नीत वाद होऊ लागले. तसेच प्रकाशच्या पत्नीत आणि सोनालीतही भांडणे सुरू झाली. त्यातूनच प्रकाशला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे सोनालीलाही तो मारहाण करू लागला. परिणामी, निराश होऊन सोनाली मुलुंड येथील आपल्या माहेरी गेली. तरीही प्रकाशने तिचा पाठलाग सोडला नाही. तो मुलुंडमधील तिच्या घरी जाऊ लागला. तेथेही प्रकाशकडून सोनालीला मारहाण होत होती. त्यामुळे सोनाली वैतागली. याचदरम्यान, सोनालीचे एकाशी प्रेम जुळले. सोनालीने दुसऱ्या प्रियकराला ‘मला प्रकाशपासून सुटका हवी आहे. तू काहीही कर,’ असे सांगितले. तेव्हा दुसऱ्या प्रियकराने सोनाली तसेच सोनालीचा भाऊ निखिल, सोनालीची मैत्रीण ज्योती व ज्योतीचा भाऊ मनोज तसेच मनोजचा एक नातेवाईक अशा सहाजणांनी सोनालीच्या घरात बसून प्रकाशच्या हत्येचा कट रचला. ७ फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे प्रकाश सोनालीला भेटण्यासाठी मुंबईला गेला. जाताना त्याने घरी आपल्या पत्नीलाही तशी माहिती दिली होती. प्रकाश घरी आल्यानंतर सोनालीने याची माहिती आकाशला दिली. आकाश त्याच दिवशी नागपूर येथून मुंबईकडे निघाला. ‘आम्ही सर्वजण महाबळेश्वर फिरायला निघालो आहे. तू येतोस का?,’ असे सोनालीने प्रकाशला विचारले. प्रकाशही त्यांच्याबरोबर महाबळेश्वरला फिरण्यासाठी आला. मंगळवारी दुपारी ते महाबळेश्वरला आले. त्यानंतर ते लॉडविक पॉइंटकडे आले. एक तास फिरल्यानंतर सर्वांनीच पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर ते महाबळेश्वरकडे येण्यास निघाले. थोडे अंतर चालल्यावर एक पायवाट दिसली. त्या वाटेने राहुल व आकाश जंगलात गेले. ‘फोटोसाठी चांगली जागा आहे,’ असे सांगून त्यांनी प्रकाशला लॉडविक पॉइंटच्या टेकडीवर नेले. टेकडीवर सोनाली व प्रकाश यांच्यात भांडण सुरू झाले. या भांडणातून प्रकाशला खाली पाडण्यात आले. त्यातील एकाने पाय धरले तर दुसऱ्याने प्रकाशचा गळा चिरला. ओळख पटू नये म्हणून प्रकाशच्या तोंडावर मोठा दगड घालून चेहरा विद्रूप करण्यात आला. प्रकाशचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच सर्वजण महाबळेश्वरात आले. त्यानंतर पोलादपूर व तेथून मुंबईला गेले. (वार्ताहर) भेळवाल्याने आरोपींना ओळखले... खून झाल्यानंतर प्रकाशच्या खिशातील सर्व वस्तू आरोपींनी नेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना तपासाची दिशा निश्चित करताना अडचणी येत होत्या; परंतु पोलीस निरीक्षक सावंत यांनी पॉइंटवरील भेळवाल्याला भेटून बोलते केले. मृताच्या पोटात शवविच्छेदनादरम्यान भेळ आढळून आली. प्रथम नकार देणाऱ्या भेळवाल्याने आपण सर्वांना पाहिल्याची कबुली देत अटक करणाऱ्यांना ओळखलेही.