शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला सर्वाधिक पावसाची नोंद, कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा 

By नितीन काळेल | Updated: July 13, 2024 18:43 IST

जुलै महिन्यातच पावसाचा जोर वाढला

सातारा : जिल्ह्यात मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान अधिक राहिले आहे. कोयनानगर येथे ७२०, नवजाला ५३४ आणि महाबळेश्वरला ११८ मिलिमीटर पाऊस जादा झाला आहे. तर कोयना धरणातही गतवर्षीच्या तुलनेत ११ टीएमसीने साठा अधिक आहे. सध्या धरणात ३४.६० टीएमसी साठा झाला आहे. तर शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला ११९ मिलिमीटर झाला होता.जिल्ह्यात गेल्यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू झाला होता. तसेच त्यानंतरही पावसाची उघडझाप होती. त्यामुळे जुलै महिन्यातच पावसाचा जोर वाढलेला. पण, गतवर्षी एकूणच पाऊस कमी झालेला. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्जन्यमानाने १०० टक्क्यांची सरासरीही गाठली नव्हती. सर्वच तालुक्यात कमी पाऊस झालेला. यामुळे बहुतांशी प्रमुख धरणे भरली नव्हती. कोयना धरणातही ९५ टीएमसीपर्यंतच साठा झालेला. परिणामी गेल्यावर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झालेली. मात्र, यंदा आतापर्यंततरी पाऊस चांगला झालेला आहे.यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनचा पाऊस दाखल झाला. मागील एक महिन्यापासून पाऊस होत आहे. पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत असलेतरी शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली. तसेच कोयनासारख्या महत्त्वाच्या धरणातही सावकाश का असेना पाणीसाठा वाढू लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहिले आहे. गेल्यावर्षी १३ जुलैपर्यंत कोयनेला ९२८ मिलिमीटर पर्जन्यमान झाले होते. यंदा १ हजार ६४८ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तसेच नवजा येथे मागीलवर्षी १ हजार ३२९ मिलिमीटर पाऊस झालेला. तर आतापर्यंत नवजा येथे १ हजार ८ ३३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. तसेच महाबळेश्वरलाही अधिक पाऊस झाला आहे.एक जूनपासून आतापर्यंत येथे १ हजार ५१५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे पश्चिम भागातही यंदा जादा पाऊस झाल्याचे समोर आलेले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४२ तर नवजाला ८० मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. त्याचबरोबर कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. ११ हजार ५८५ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून ३४.६० टीएमसी झाला आहे.

महाबळेश्वर तालुक्यात ६६ मिलिमीटर पाऊस..जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी-अधिक फरकाने पाऊस पडत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७.५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तालुक्यात ६६.८ मिलिमीटर पडला. तर सातारा तालुक्यात ४.७, जावळी १३.९, पाटण ६.९, कऱ्हाड तालुक्यात ३.२, कोरेगाव ३.२, खटावला १.४, माणमध्ये ०.४, फलटण तालुक्यात १.७, खंडाळा ५.२ आणि वाई तालुक्यात सरासरी १४.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानKoyana Damकोयना धरण