शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
2
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
3
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
4
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
5
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
6
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
7
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
8
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
9
तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले
10
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
11
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
12
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
13
बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा
14
एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना
15
गुगलवरून शोधले विदेशी फळ; उत्पन्न एकरी 10 लाख; मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्याची यशोगाथा
16
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
17
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
18
शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध आणि ताठ कण्याचा व्रतस्थ अभ्यासक
19
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

विशेष सन्मान, विशेष टपाल कॅन्सलेशनवर झळकली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ! 

By सचिन काकडे | Published: December 10, 2024 1:45 PM

सचिन काकडे सातारा : शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे, समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि भारताच्या कृषी यशाचे प्रतीक असलेल्या महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीचे छायाचित्र ...

सचिन काकडेसातारा : शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे, समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि भारताच्या कृषी यशाचे प्रतीक असलेल्या महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीचे छायाचित्र विशेष शाश्वत चित्रात्मक टपाल कॅन्सलेशनवर झळकले आहे. मुंबई येथील टपाल कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात या कॅन्सलेशनचे अनावरण करण्यात आल्याने महाबळेश्वरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरात स्ट्रॉबेरीची शेती केली जात आहे. पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली गेली. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान विकसित झाले. मातीविना शेती हा प्रयोगही येथे राबविण्यात आला. तालुक्यातील दोन हजारांहून अधिक शेतकरी सध्या स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत. भारतात स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक ८५ टक्के उत्पादन एकट्या महाबळेश्वर तालुक्यात घेतले जाते. या स्ट्रॉबेरीची जागतिकस्तरावर असलेली लोकप्रियता आणि महत्त्व लक्षात घेऊन टपाल विभागाकडून स्ट्रॉबेरीचा विशेष सन्मान करण्यात आला.

मुंबई टपाल कार्यालयात सोमवारी झालेल्या सोहळ्यात स्ट्रॉबेरीचे छायाचित्र असलेल्या विशेष टपाल कॅन्सलेशनचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला डाक विभागाच्या सचिव वंदिता कौल, महाराष्ट्र आणि गोवा पोस्टल सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी आदी उपस्थित होते.

महाबळेश्वर स्ट्रॉबेरीचा स्वाद आणि त्याचे व्यावसायिक महत्त्व देश-विदेशात प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनाने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना दिली असून, ही स्ट्रॉबेरी टपाल कॅन्सलेशनवर झळकल्याने तिचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या स्ट्रॉबेरीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळेल. - वंदिता कौल, सचिव - डाक विभाग

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानPost Officeपोस्ट ऑफिस