अजित जाधव, महाबळेश्वर: थंडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर मध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून तापमानात घसरण होऊ लागल्याने कडाक्याची थंडी महाबळेश्वर शहराची नजाकतच दाखवून देत आहे कडाक्याच्या थंडी सोबतच गार वारे वाहत स्थानिकांसह पर्यटक महाबळेश्वरमध्ये ''काश्मीर'' चाच जणू अनुभव घेत असून शनिवार पहाटे नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेक, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य आज पुन्हा एकदा पाहावयास मिळाले.
कडाक्याच्या थंडीमुळे मुख्य बाजारपेठेत सायंकाळी येथील मुख्य बाजारामध्ये फिरताना पर्यटक शाल,स्वेटर,कानटोपी परिधान करून फेरफटका मारताना दिसून येत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"