शहरं
Join us  
Trending Stories
1
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
2
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
3
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
5
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
6
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
7
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
8
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
9
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
10
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
11
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
12
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
13
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप
14
इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!
15
विराट कोहलीच्या आवडत्या कंपनीची कमाल, एका झटक्यात कमावले ८३८ कोटी रुपये
16
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
17
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
18
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
December Born Astro: डिसेंबरमधले लोक असतात आळशी, हट्टी, तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यात होतात यशस्वी!
20
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग

महाबळेश्वरच्या बोटी भ्रष्टाचाराच्या गाळात

By admin | Published: January 29, 2017 10:43 PM

!पाच कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश : नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवकांच्या अचानक भेटीनंतर परिसरात खळबळ

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील वेण्णा लेकच्या बोट क्लबमधील गैरव्यवहाराची माहिती मिळताच नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी आशा राऊत व नगरसेवक कुमार शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी सर्जिकल स्ट्राईक करत बोट क्लबला अचानक भेट दिली. यावेळी आर्थिक व्यवहारात मोठी तफावत आढळून आल्यानंतर पाच कर्मचाऱ्यांची चौकशी करुन निलंबित करावेत असे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले. नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी दिलेली माहिती अशी की, ‘महाबळेश्वर पालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन म्हणून वेण्णा लेक बोट क्लबकडे पाहिले जाते. वेण्णा बोटक्लबला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणूनही ओळखले जाते. हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणाचे मुख्य केंद्र असून, महाबळेश्वरात दाखल होणारे प्रत्येक पर्यटक याठिकाणी नौकाविहाराचा आनंद लुटतात. येथे पालिकेने पँडल व रोइंग बोटीची सोय केली आहे. हे ठिकाण खाऊगल्लीसाठी मोक्याचे असल्याने येथे नेमणूक मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये चढाओढ लागते. येथील गैरव्यवहार अनेकवेळा उघडकीस येऊनही कारवाई शून्य झाल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात होता. मात्र, प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेतली नव्हती. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी येथे नवीन तंत्रज्ञानाची डिजिटल यंत्रणा बसविली असली तरीही भ्रष्टाचाराच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत. या संदर्भात दोन आठवड्यांपूर्वी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी आशा राऊत, सर्व नगरसेवक व पालिकेचे विविध खात्यांतील प्रमुख अधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत आर्थिक अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता. तरीही याकडे दुर्लक्ष होत होते. यासंदर्भात नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्याकडील तक्रारींचा ओघ वाढला होता. अहमदाबाद येथील एका पर्यटकाने या संदर्भात नगराध्यक्षांकडे तक्रार केली. या तक्रारीची गांभिर्याने दखल घेण्यात आली. नगराध्यक्षा शिंदे, मुख्याधिकारी राऊत, नगरसेवक कुमार शिंदे यांनी शनिवारी बोट क्लबला अचानक भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गर्दीच्या वेळी सायंकाळी साडेसात वाजता ही मंडळी बोट क्लबवर पोहोचली. नगराध्यक्षांनी बुकिंग काउंटर तर मुख्याधिकाऱ्यांनी रिफंड काउंटरचा ताबा घेतला. नगरसेवक शिंदे यांनी जेटीवर लक्ष ठेवले. बोट क्लबवर छापा पडल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांमध्ये चुळबूळ सुरू झाली. आठ वाजता क्लब बंद झाल्यानंतर सर्व व्यवहारांची तपासणी केली. कर्मचारी, बोटमन यांचे हजेरी पत्रक व कामकाजाच्या नोंदीची तपासणी केली असता मोठी तफावत आढळली. (प्रतिनिधी) गैरहजर कर्मचारीही कामावर...बोट क्लबवर कायम २४ तर कंत्राटी ४० बोटमन आहेत. यापैकी अनेक बोटमन गैरहजर असतानाही त्यांनी बोटींच्या फेरी मारल्याच्या नोंदी आढळल्या. तर अनेक कर्मचारी हजर असतानाही त्यांनी गर्दी असतानाही एकही फेरी मारली नाही, अशा अनेक नोंदी आढळून आल्या. अनियमितेच्या अनेक नोंदी आढळल्या असून, या सर्व गैरव्यवहाराचा मुख्याधिकारी आशा राऊत यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. येथील आर्थिक गैरव्यवहारासाठी पाच लिपिकांना प्रथमदर्शनी जबाबदार धरले असून, त्यांच्या चौकशीचे आदेश नगराध्यक्षा शिंदे यांनी दिले आहेत.साडेसहा हजार बेहिशोबीबोट क्लबचा दिवसाचा व्यवसाय २ लाख १८ हजार ७० रुपये झाला होता; परंतु प्रत्यक्ष प्रत्येक्षात २ लाख २४ हजार ६४० रुपये आढळले. जादाच्या ६,५७० रुपयांच्या व्यवहाराची कोठेही नोंद नव्हती.