प्रमोद सुकरे क-हाड (जि.सातारा) : क-हाडच्या मारुतीबुवा क-हाडकर मठाला दोनशे वर्षांची परंपरा आहे. शहराच्या मध्यभागी असणारा मठ क-हाडकरांसह जिल्ह्याचे श्रद्धास्थान आहे. मात्र, दोन बुवांच्यात मठाधिपती होण्याच्या कारणावरून वाद पेटला. तो वाद न्यायालयीन प्रक्रियेत असताना दोन दावेकऱ्यांपैकी एकाने दुस-याचा पंढरपूरात खून केल्याने वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे.संत सखूची भूमी असणा-या क-हाडकर मठात वारकरी संप्रदायात काम करणाºया एकाची मठाधिपती म्हणून निवड करण्याची परंपरा आहे. आत्तापर्यंत या मठाला सहा मठाधिपती लाभले आहेत. त्यांनी कºहाडसह परिसरात वारकारी संप्रदाय प्रसाराचे काम केले आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी मारुतीआबा साबळे महाराज यांच्या निधनानंतर उत्तराधिकारी म्हणून बाजीराव जगताप बुवा व जयवंत पिसाळ बुवा हे दोघे आपला दावा सांगू लागले. मारुती साबळे महाराज यांच्या निधनानंतर त्यांचे सर्व अंत्यविधी हे बाजीराव जगताप (रा. कोडोली, ता. कºहाड) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे आता उत्तराधिकारी मीच आहे, असे ते मानू लागले. सुरुवातीला मठाच्या विश्वस्तांनीही त्याला मूक संमती दिली. मात्र, बाजीराव जगताप आणि विश्वस्तांचे फार काळ जुळले नाही. विश्वस्तांनी कागदोपत्री जयवंत बुवा यांची मठाधिपती म्हणून निवड केली आणि वादाचा भडका उडाला.
मठाधिपतीपद मिळविण्यासाठी महाराजांनी काढला काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 4:42 AM