शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

१३ तास.. १६ पोती अन् २ हजार चौरस फुटांची छत्रपती संभाजी महाराजांची महारांगोळी; सातारकरांच्या आकर्षणाचे केंद्र 

By प्रगती पाटील | Published: April 08, 2024 6:59 PM

चाळीस दिवसांचा सुतकाचा महिना

सातारा : फाल्गुन अमावस्या अर्थात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यातील रांगोळी कलाकार आकाश दळवी याने चक्क १३ तासात १६ पोती रांगोळींचा वापर करून तब्बल ६० बाय ३६ फुट अर्थात २ हजार चाैरस फुट क्षेत्रात छत्रपती संभाजी महाराज यांची रांगोळी रेखाटली. राजवाडा चाैपाटी येथील ही रांगोळी सातारकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज यांना आदरांजली म्हणून राजवाडा चौपाटी गांधी मैदान येथे ही रांगोळी काढण्यात आली. औरंगजेब ने फितुरीने संभाजी महाराज याना अटक केली व ४० दिवस त्यांचे अतोनात हाल करून फाल्गुन अमावस्या दिवशी त्यांना मारून टाकले जगाच्या इतिहासत एकाद्या राजाला एवढ्या क्रूरपणे मरण्याची ही एकमेव घटना. त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने व संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली खेडोपाडी युवक पाळत आहेत.

याचाच भाग म्हणून साताऱ्यातील आकाश दळवी या रांगोळी कलाकाराने रविवारी रात्री ९ वाजता रांगोळी रेखाटायला सुरूवात केली. यासाठी त्याला बबन लोहार आणि साइ थोरात या दोन कलाकारांचीही मदत झाली. रात्री ९ वाजता सुरू झालेले हे रेखाटन तब्बल १३ तास चालले सकाळी ११ वाजता ही रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. गौंधी मैदानाच्या सोमण व्यासपीठासमोर काढलेली ही महाकाय रांगोळी अनेकांचे लक्ष वेधून घेत होती.

चाळीस दिवसांचा सुतकाचा महिनाधर्मवीर संभाजी महाराज यांचा छळ झाला ते ४० दिवस सुतकाचा महिना म्हणून महाराजांच्या विचारांचा आणि त्यागाच्या महिन्यात युवक गोड खात नाही, पायात चप्पल घालत नाहीत, गादीऐवजी जमिनीवर झोपतात. अशा कृतीतून श्रध्दांजली व बलिदान मास पाळला जातो. धर्मवीर बलिदान मास उभ्या हिंदुस्थानला अंतर्मुख करणारा क्लेशकायक, दुःखदायक मास आहे. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या महिना भरात रोज एकत्र जमून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास याचे श्लोक पठण होत असते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासच्या निमित्ताने त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. यंदा राजवाडा गांधी मैदानावर त्यांची भली मोठी रांगोळी साताऱ्यातील कलाकारांनी साकारली. यानिमित्ताने राजांचे कार्य आणि त्यांचा त्याग याची माहिती पुढील पिढीस होण्यास मदत होइल. - धनंजय खोले,

टॅग्स :Satara areaसातारा परिसर