शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

Vidhan Sabha Election 2024: प्रीतिसंगमावर पहिल्यांदाच कमळ फुलले; कऱ्हाड दक्षिण, उत्तरमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 16:50 IST

सातारा: राज्याचे आणि सातारा जिल्ह्याचे राजकारण ज्यांच्या विचारावर उभे राहिले आणि वाढले त्या यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीत आणि कऱ्हाड ...

सातारा: राज्याचे आणि सातारा जिल्ह्याचे राजकारण ज्यांच्या विचारावर उभे राहिले आणि वाढले त्या यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीत आणि कऱ्हाड दक्षिण व उत्तर मतदारसंघात प्रथमच काँग्रेसचा पराभव झाला आहे. याठिकाणी असलेल्या या दोन्ही मतदारसंघांच्या प्रीतिसंगमावर भाजपचे कमळ फुलले आहे. यशवंत विचार पुढे घेऊन जाणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा याठिकाणी पराभव झाला.सातारा जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीत मोठे फेरबदल झाले आहेत. यातील कऱ्हाड उत्तर या मतदारसंघाचे नेतृत्व हे सुरुवातीला यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील आणि बाळासाहेब पाटील यांनी केले होते. बाळासाहेब पाटील यांनी राज्याचे सहकारमंत्री म्हणून आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम केले आहे.पी. डी. पाटील आणि बाळासाहेब पाटील हे दोघेही यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने चालणारे होते. सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासारखा चांगला कारखाना त्यांनी सचोटीने चालवला. त्यामुळे या भागातील ते मतदार राखून होते. पण, भाजपच्या मनोज घोरपडे या उमेदवाराने मतदारसंघाची चांगली बांधणी करत त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांची मिळालेली साथ विचारात घेता बाळासाहेब पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ तर स्वत: यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ. या मतदारसंघाचे नेतृत्व यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. या सर्वच दिग्गजांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदापासून महत्त्वाची खाती सांभाळली होती. त्यामुळे पहिल्यापासून या मतदारसंघात कोणालाच शिरकाव करता आला नव्हता. राज्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच या मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आला आहे.

अखेर अतुल भोसले यांनी विजयश्री खेचून आणलीकऱ्हाड दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मतदारसंघात अतुल भोसले यांचा संपर्क होता. यापूर्वी त्यांनी कऱ्हाड उत्तरमधूनही निवडणूक लढविली होती. त्यानंतर मागील तीन निवडणुका त्यांनी कऱ्हाड दक्षिणमधून लढल्या. प्रत्येक वेळी त्यांनी जोरदार लढत दिली. मात्र, दिग्गजांसमोर त्यांचा टिकाव लागत नव्हता. अखेर यावेळी त्यांनी जोरदार तयारी करत विजयश्री खेचून आणली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024karad-north-acकराड उत्तरkarad-south-acकराड दक्षिणcongressकाँग्रेसBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024