शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

जनतेच्या भावनांशी खेळणे म्हणजे मोठी गद्दारी, उदयनराजे भोसले यांची शरद पवार यांच्यावर टीका

By दीपक देशमुख | Published: November 20, 2024 12:02 PM

''युगेंद्र पवार परदेशात राहतात, त्यांना बळीचा बकरा केला''

सातारा : वाई येथे गद्दारांना पाडा, असे खासदार शरद पवार म्हणाले होते. परंतु, सत्ता असल्यापासून गेली साठ वर्षे केवळ त्यांनी व काँग्रेसने घोषणाच केल्या. लोकांची कामे केलीच नाहीत. लोकांच्या भावनांशी खेळले, याच्यापेक्षा मोठी गद्दारी होवू शकत नाही, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्यावर केली.सातारा येथे अनंत इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रांवर खासदार उदयनराजे भोसले, कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला.उदयनराजे म्हणाले, विनोद तावडे यांचे चारित्रहनन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे. एखाद्या रूममध्ये बसले असताना पैशाची बॅग ठेवून फोटो काढायचे, हे सगळे नियोजित आहे. राजकारणात अनेक वर्षांपासून असले प्रकार सुरूच आहेत.लोकांचा राज्यकारभारात सहभाग असावा, असे विचार मांडणारे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव होते. त्यांनी लोकशाहीचा पाया रचण्याचे काम केले. त्यांना अभिप्रेत असणारे लोककल्याणकारी राज्य झाले पाहिजे. परंतु, स्वातंत्र्यानंतरच्या काळात सत्ताधारी काँग्रेसने फक्त अनेक घोषणा केल्या. घोषणा फक्त मते मिळवण्यासाठीच होत्या. त्यांच्या ६० वर्षाच्या काळात कोणतीही कामे झाली नाहीत की चांगली धोरणे राबवली गेली नाहीत.परंतु, लोकांना प्रगतीच्या मार्गाने जायचे आहे. हाताचा पंजा सत्ता असताना काही करू शकला नाही. तुतारीने केवळ पोकळ घोषणांचा गाजावाजा केला जात आहे. मशालवाल्यांना तर त्यांनी काय काम केलंय ते मशाल घेवून शोधावे लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला.युगेंद्र पवार परदेशात राहतातबारामतीत अजित पवार यांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार उभे आहेत. युगेंद्र पवार यांनी आयुष्य परदेशात काढले आहे. त्यांनी तसंच रहावं. ज्यावेळी काम करायचे होते त्यावेळी केले नाही. आता निवडणुकीच्या काळात हौशे नवशे गवशे असतात. त्यांना बळीचा बकरा केला असल्याचेही उदयनराजे यावेळी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराwai-acवाईUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024