सातारा : काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून आम्हाला जुळवून घेण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ७६ जागा लढविणार आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील खटावमधील पारधी समाजातील महिलेला उमेदवारी देणार असल्याची माहिती आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.माने म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने आमची फसवणूक केली. केवळ दोन महिने आम्हाला झुलवत ठेवले. सोबत घ्यायचे नव्हते तर तेव्हाच सांगायचे ना. आमच्या आघाडीत सर्वसामान्य व गरीब लोक असल्यामुळे आम्हाला तिकीट देऊन उपयोग काय? असे प्रश्न आम्हाला केले जात होते. मात्र, घटनेने आम्हाला निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार दिला आहे.
निवडून येऊ अथवा न येऊ, हे वंचित आघाडीचे धोरण असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ७६ ठिकाणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जाणार आहेत. तसेच भाजप सरकारचा या निवडणुकीत पराभव करणे, हाच आमचा उद्देश आहे, असेही यावेळी लक्ष्मण माने यांनी सांगितले.