कऱ्हाड (सातारा) : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी गुरुवारी सकाळी मराठा समाजबांधवांनी सामूहिक मुंडण आंदोलन केले. यावेळी एक मराठा, लाख मराठा असा जयघोष करीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी मागणी केली.दरम्यान, आशियाई महामार्ग ४७ वर उंब्रज येथील तासवडे टोलनाक्यावर काही मराठा समाजबांधवांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भजन करीत रास्तारोको केला.कऱ्हाड तालुक्यातील मराठा माता-भगिनींकडून १ आॅगस्टपासून सुरू करण्यात आलेले ठिय्या आंदोलन गुरुवारी तात्पुरते स्थगित करण्यात आले. बंदवेळी शांतता पाळण्याचे आवाहनही करण्यात आले.कऱ्हाड शहरातील नागरिक तसेच कृष्णा-कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर दररोज पोहण्यासाठी येणाऱ्या मराठा समाजबांधवांनी एक मराठा, लाख मराठा असा जयघोष करीत समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मुंडण करून शासनाचा निषेध नोंदविला.ओगलेवाडी, वडगाव हवेली येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कऱ्हाड -तासगाव रोडवर वडगाव हवेली येथे मराठा समाजबांधवांनी तासभर रास्तारोको आंदोलन केले.तासवडे टोलनाक्यावर रास्तारोको अन् भजनमराठा समाजबांधवांच्या वतीने गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आशियाई महामार्ग ४७ वरील तासवडे टोलनाक्यावर रास्तारोको केला. यावेळी काही समाजबांधवांनी सोबत टाळ आणि मृदंगही आणले होते. त्यांनी महामार्गावर ठिय्या मांडत भजनही केले.
Maharashtra Bandh : कऱ्हाडात मराठा समाजबांधवांचे सामूहिक मुंडण, तासवडे टोलनाक्यावर भजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 2:08 PM
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी गुरुवारी सकाळी मराठा समाजबांधवांनी सामूहिक मुंडण आंदोलन केले. यावेळी एक मराठा, लाख मराठा असा जयघोष करीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी मागणी केली.
ठळक मुद्देकऱ्हाडात मराठा समाजबांधवांचे सामूहिक मुंडण, तासवडे टोलनाक्यावर भजन कृष्णा नदीकाठी घुमला एक मराठा.. लाख मराठाचा जयघोष