शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

Maharashtra Election 2019 : किल्लेदार फोडले बालेकिल्ला घेण्याचा मनसुबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 4:05 AM

जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा धडाका लावला.

- दीपक शिंदेराष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा सातारा जिल्हा भाजपच्या नेत्यांनी सतत तोफगोळे टाकून खिळखिळा केला. किल्ला ताब्यात येत नाही म्हटल्यावर किल्लेदारांनाच आपल्या बाजूला घेत बालेकिल्लाच ताब्यात घेण्याचा मनसुबा आखला आहे. जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात, दोन काँग्रेसकडे आणि एक शिवसेनेकडे अशी स्थिती आहे. यावेळी निवडणुकीत पाच मतदारसंघात दुरंगी तर तीन मतदारसंघांत तिरंगी लढत होत आहे.जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा धडाका लावला. भाजपने त्यांना सामावून घेतले आणि जुन्यांना थांबवत नव्याने प्रवेश दिलेल्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले काहीजण भाजपमधूनही बाहेर पडले. ज्यांना उमेदवारी देतो म्हणून आश्वासन दिले, त्यांना ऐनवेळी मित्रपक्षाची उमेदवारी दिली तर काहींना चक्क थांबविले. त्यामुळे बंडखोरी झाली.साताऱ्यात भाजपकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीकडून दीपक पवार यांच्यातील पारंपरिक लढत तशीच होतेय. फक्त त्यांच्या पक्षाची अदलाबदल झाली आहे. पाटणमध्ये शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांच्यात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पार पडेल. वाईमध्ये राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले मदन भोसले यांच्यात जोरदार लढत होईल, तशीच स्थिती कोरेगावमध्येही पाहायला मिळेल. याठिकाणी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि भाजपमधून शिवसेनेमध्ये आलेले महेश शिंदे यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे.प्रचारातील प्रमुख मुद्दे१) आघाडी सरकारच्या काळात कामेच झाली नाहीत.२) दुष्काळी भागात पाणी नेणे, आरोग्य महाविद्यालय, हद्दवाढ, उद्योग आणि बेरोजगारी हटविणे३) अपूर्ण सिंचन योजना, कालव्यांची कामे पूर्ण करणे, रखडलेले सहापदरीकरणरंगतदार लढतीमाणमध्ये शेखर गोरे आणि जयकुमार गोरे हे सख्खे भाऊ एकमेकांविरोधात लढत आहेत. दोघांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावून सेना आणि भाजपची उमेदवारी मिळविली आहे. याठिकाणी गोरे बंधूंसमोर सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी विकासाच्या मुद्द्यावर आव्हान उभे केले आहे.फलटणमध्ये रामराजे नाईक-निंबाळकर समर्थक राष्टÑवादीचे दीपक चव्हाण आणि रिपाइंने दिलेली दीपक निकाळजे यांची उमेदवारी रद्द करून भाजपने दिलेले दिगंबर आगवणे यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे.कºहाड दक्षिण मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांच्यात चांगली लढत होईल. तर अपक्ष उदयसिंह उंडाळकर किती मते घेणार? यावर पृथ्वीराज चव्हाण विजयी होणार की अतुल भोसले , हे अवलंबून असेल. कºहाड दक्षिणमध्ये सर्वाधिक विकास कोणी केला? हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे.

टॅग्स :Jaykumar Goreजयकुमार गोरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Satara areaसातारा परिसर