Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 08:39 PM2024-11-08T20:39:16+5:302024-11-08T20:59:11+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज कराड येथील जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ready for face-to-face discussion Prithviraj Chavan's open challenge to Amit Shah | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीच्या बड्या नेत्यांच्या प्रचारसभांना आजपासून सुरुवात झाली असून आज कराड येथे केंद्रीय मंत्री अमित शाह यांची जाहीर सभा झाली. या सभेत शाह यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. या टीकेला माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रत्युत्तर देत शाह यांना चॅलेंज दिले आहे.

शाह यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी खासदार शरद पवार यांच्यावर खोटे बोलत असल्याचा आरोप केला. या वयातही शरद पवार खोटं बोलणं टाळत नसल्याचं अमित शहा म्हणाले. शाह यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून स्थानिक पातळीवर केलेल्या कामाचा हिशेब मागितला. शाह म्हणाले, "ते हिशोब देणार नाहीत, पण मी एका व्यावसायिकाचा मुलगा आहे आणि माझ्याकडे हिशोब आहे., अशी टीका शाह यांनी केली. या टीकेला आता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले.

"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान

'गुजरातला मोठं करण्यासाठी बुलेटट्रेन'

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अमित शाह २०१९ मध्येही सभा घेण्यासाठी आले होते. पण त्यांना काही यश आले नाही, काही लोकांच आता मत त्यांचा चांगला पायगुण आहे असं आहे, असा टोला चव्हाण यांनी शाह यांना लगावला.'त्यांनी विकासावर समोरासमोर बोलायला पाहिजे, भूकंप संशोधन केंद्र ६०० कोटींच हवेतून पडलेलं नाही ते आम्ही आणलेलं आहे, आज महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात देशात ११ वा क्रमांकावर आहे. याला अमित शाह जबाबदार आहेत, त्यांनीच हे सरकार स्थापन केले आहे. आज महाराष्ट्राच्या पुढे बाकीचे राज्य आहेत. यामुळेच आज राज्यात बेरोजगारीचे मोठे प्रमाण आहे. सगळे उद्योग शाह यांनी गुजरातला पळवले आहेत, असा आरोपही चव्हाण यांनी केला. 

"मुंबईच इंटरनॅन्शन फायनान्स सेंटर गांधीनगरला कोणी पळवलं. महाराष्ट्राचे त्यावेळे मुख्यमंत्री तोंडावर पट्टी बांधून बसले होते.त्या सेंटरमध्ये कोणी आंतरराष्ट्रीय प्रवासी कोण येत नाहीत म्हणून बुलेट ट्रेन करत आहात. गुजरातला मोठं करण्यासाठी बुलेटट्रेन करत आहात त्याचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. या बुलेट ट्रेनची मागणी कोणी केली होती? याची उत्तर अमित शाह यांनी दिली पाहिजेत, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पैसे खाणाऱ्यांनी तुम्ही जवळ घेऊन बसलात. हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान ज्यांनी केला त्यांचं तुम्ही कौतुक करता त्यांनी तुम्ही मत द्या म्हणून सांगता, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ready for face-to-face discussion Prithviraj Chavan's open challenge to Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.