शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

बाथा हायस्कूल सभागृहात प्रवेश नाकारल्याने महात्मा गांधींना रस्त्यावरच अभिवादन, साताऱ्यात गांधीप्रेमी संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 4:01 PM

ज्या ठिकाणी गांधीजींच्या हत्येचा कट स्वातंत्र्यसेनानी कै. भि. दा. भिलारे गुरुजी यांनी उधळला. त्या बाथा हायस्कूल सभागृहात अभिवादनासाठी शाळा प्रशासनाने प्रवेश नाकारल्याने गांधीप्रेमी संतप्त

पाचगणी : पाचगणी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. परंतु ज्या ठिकाणी गांधीजींच्या हत्येचा कट स्वातंत्र्यसेनानी कै. भि. दा. भिलारे गुरुजी यांनी उधळला. त्या बाथा हायस्कूल सभागृहात अभिवादनासाठी शाळा प्रशासनाने प्रवेश नाकारल्याने संतप्त गांधीप्रेमींनी रस्त्यावरच बंद गेट बाहेर अभिवादन केले.महात्मा गांधी स्मारक समिती, पाचगणी नगरपालिका, सह्याद्री पत्रकार संघ, कांताबेन जे. पी. महेता कॉलेज, नगरपालिका शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी अभिवादन करण्यात आले. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी चौकातील पुतळ्याला पुष्पहार घातला.मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, बशीर पटेल, राजेंद्र भिलारे, महेंद्र पांगारे, स्मारक अध्यक्ष प्रा. शिवाजी राऊत, असलम तडसरकर, जालिंदर पाटील, राजपूत, लक्ष्मण हिरवे, रविकांत बेलोशे उपस्थित होते.दापकेकर म्हणाले, ‘महात्मा गांधी आणि पाचगणी यांचे नाते खूप जवळचे आहे. यासाठी पालिका पाचगणी टेबल लँड येथे आम्ही करीत असलेल्या इंटर पिटेशन सेंटरमध्ये महात्मा गांधीजींच्या माहितीपर वस्तू व लिखाण आम्ही ठेवणार आहे.’त्यानंतर सर्व जण कस्तुरबा गांधी रुग्णालयात दखल झाले, या ठिकाणी रुग्णालयाच्या आवारात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यानंतर सर्व गांधीप्रेमी महात्मा गांधीजींचे प्रार्थनास्थळ असणाऱ्या बाथा हायस्कूल येथे आले. परंतु ट्रस्टीचे कारण देत शाळा प्रशासनाने गांधीप्रेमींना सभागृहात प्रवेश नाकारला. त्यामुळे सर्व गांधीप्रेमी संतप्त झाले.शाळेच्या गेटवरच रस्त्यावर गांधींना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी अभिवादन करून घोषणा दिल्या. काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने या शाळेच्या प्रशासनाने नाकारले होते. यावर्षीही पुनरावृत्ती झाल्याने नागरिक नाराज झाले.

  • पांगारी येथील पहिलीत शिकणाऱ्या पार्थ पांगारे याने महात्मा गांधीजी यांचा वेश परिधान करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले तर त्याने महात्मा गांधीजी यांच्यावर केलेले भाषण तर सर्वांचेच आकर्षण ठरले.
  • मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी महात्मा गांधीजींचे वास्तव्य ठरलेल्या बेबी पॉइंट येथे गांधीजींच्या स्मृती जतन करण्यासाठी पालिका प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी गांधी विचारप्रेमी बशीर पटेल यांना सन्मानचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahatma Gandhiमहात्मा गांधी