सातारा : महाविकास आघाडीमध्येमुख्यमंत्री कोण होणार यावरुन वादविवाद सुरु आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्याचा उमेदवार ठरविण्यापेक्षा विरोधीपक्षनेतेपदाचा उमेदवार ठरविणे गरजेचे आहे. आघाडीतील नेत्यांच्या तंगड्यात त्यांच्याच गळ्यात अडकणार आहेत असा टोला मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी लगावला.
तर महायुतीत कोणतीही स्पर्धा नाही आणि मी तर स्वत:ला मुख्यमंत्री न मानता सर्वांना उपलब्ध असलेला कॉमन मॅन समजतो असे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या आपल्या गावी अचानक आले होते. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. गेल्या दोन सव्वा दोन वर्षात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे झाली आहेत. याची पोच पावती जनता मतपेटीतून दिल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान राज्यात कुठेही बंडखोरी होणार नाही महायुती समन्वयाने लढेल असेही शिंदे यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीने केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्रातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही. कारण जेवढे काम केले, जेवढे प्रकल्प पुढे नेले, जेवढ्या कल्याणकारी योजना राबवल्या. कोण उभे राहते हे महत्त्वाचे नाही तर शेवटी जिंकणं महत्त्वाचं आहे, कोणाला किती जागा द्यायच्या व कुठे कोणते उमेदवार द्यायचे हे आज दोन दिवसात ठरेल. महायुतीमध्ये कोणताही वाद नाही.महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे. ती विचार सोडलेली आघाडी आहे. बाळासाहेबांचे विचार त्यागलेली आघाडी आहे. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी झालेल्या आघाडीत लवकरच बिघाडी होईल असे मतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे परत दरे गावीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी एकदिवसीय दौऱ्यावर आले होते. दरम्यान ते आपल्या हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होत असताना खराब हवामानामुळे व प्रचंड पाऊस पडत असल्याने हेलिकॉप्टर पुन्हा दरेगावी उतरविण्यात आले आहे.