खंडाळा : खंडाळा तालुक्यातील मिरजे येथे जिल्ह्यातील पहिली महोगनी वृक्ष लागवड करण्यात आली. वनशेतीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढत असल्याने त्यांची अर्थिक प्रगती होण्याचा मार्ग सुकर होत आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या या वृक्षांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता येणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत, खंडाळा तालुक्यातील मिरजे येथे महोगनी वृक्ष लागवड करण्यात आली. शेतकरी बांधवांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदलत वन शेतीकडे वळणे गरजेचे आहे. महोगनी वृक्ष वातावरणात ‘ऑक्सिजन' वाढवत असून फर्निचर, जहाज बांधणी, वाद्य बनविण्यासाठी उपयोगी आहे.
देशात ‘महोगनी’ लागवड सुरू करण्यात आली असून, दहा ते बार वर्षांत एकरी ऐंशी लाख ते एक कोटी रुपये उत्पन्न मिळणार असल्याचे सांगितले जाते. वृक्ष लागवडीपासून कापणीपर्यंत क्रॉपसिटी ग्रोवेट कंपनी मार्गदर्शन करते. दरम्यान, चार हजार एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली आहे. तर या वृक्ष लागवडीला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारकडून कार्बन क्रेडिट अर्थसहाय्य मिळवून देणारे कृषी क्षेत्रातील व्यासपीठ मानले जात आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाबरोबर अर्थिक प्रगती साधावी. आगामी काळात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपाली जाधव, गोविंद पुरोहित, ग्रामसेवक दत्तात्रय खोपडे, नितीन जाधव आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी तालुका पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
_______________________________