सातारा : ‘पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. सर्वसामान्य जनतेला या निर्णयामुळे काही दिवस थोडी तसदी सोसावी लागणार असली तरी कोणाच्याही भूलथापांवर विश्वास न ठेवता आपल्याकडच्या पाचशे व हजारांच्या नोटा बँका, पोस्ट कार्यालयांतच जमा करा. यासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जिल्हावासीयांना केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी तत्काळ जिल्ह्यातील प्रमुख बँकर्स, पेट्रोल पंप असोसिएशन, व्यापारी असोसिएशन तसेच विभाग प्रमुखांची तातडीची बैठक बुधवारी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, बँक आॅफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात, स्टेट बँक आॅफ इंडियाचे प्रबंधक राजीव प्रसाद, आयडीबीआय बँकेचे प्रबंधक अनिल गोडबोले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र रुणवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई आदींसह प्रमुख बँकर्स उपस्थित होते. या बैठकीमध्ये विविध पर्यायांबाबत चर्चा करण्यात आली. पेट्रोल पंप, औषध विक्री दुकाने या ठिकाणी जनतेला वेठीस धरण्यात येऊ नये, त्यांच्या गरजा भागवाव्यात. गुरुवारपासून बँका व पोस्ट कार्यालयांमधून नोटांची बदली अथवा भरणा सुरू करण्यात येणार आहे. बँक ग्राहकांना दोन हजार रुपयांची मर्यादित रक्कम गरजेपुरती काढता येईल. जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात कुठेही ५०० किंवा १००० च्या नोटा बदलताना अडचण येणार नाही. पेट्रोल पंप चालकांनी ग्राहकांना सहकार्य करावे. ५०० रुपयांच्या नोटा या ठिकाणी घेता येणार असल्याने त्यांनी तसा फलक आपल्या पंपावर लावावा. बँकांना १००, ५०, २०, १० अशा नोटा उपलब्ध झाल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही. ज्या बँकांच्या शाखा जिल्ह्यात सर्वदूर आहेत, तेथील शाखांमध्ये सुट्या पैशांची अडचण भासू देऊ नका, अशा सूचना बँक अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. दरम्यान, सातारा जिल्ह्यात जनधन योजनेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने ९८ टक्के लोकांची खाती काढली आहेत. या खात्यांमध्ये लोकांना ५०० व १००० च्या नोटा जमा करता येतील. तसेच बँकांमधील सेव्हिंग, करंट खात्यांमध्येही पैसे जमा करता येणार आहेत. ५० दिवसांची यासाठी मुभा असल्याने नागरिकांनी गोंधळून जाऊ नये, गोंधळलेल्या परिस्थितीत काही समाजविघातक मंडळी पैसे बदलून देतो, अशी फसवणूक करण्याची शक्यता आहे. अशा भूलथापांना कोणीही बळी पडू नये. शासनाने काळा पैसा जमा करणाऱ्यांवर या माध्यमातून चाप बसवला असून, याचे दूरगामी परिणाम आपल्या सर्वांना काही दिवसांत जाणवतील. त्यामुळे या निर्णयाचे आपण सर्वांनीच समर्थन करायला हवे, असेही जिल्हाधिकारी मुदगल यांनी स्पष्ट केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या शाखांमार्फत ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य माणूस हाच प्रथम प्राधान्य ठेवून उद्या व्यवहार करावेत, असे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी वाघमारे म्हणाले, ‘बँकर्स आणि नागरिक यांनी कोणतीही
प्रमुख बँकांना उद्या कडक पोलिस बंदोबस्त
By admin | Published: November 09, 2016 10:56 PM