शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

चिंता मिटली, सातारा जिल्ह्यातील धरणे भरली

By नितीन काळेल | Published: August 29, 2024 6:59 PM

सातारा : जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत असून पश्चिमेकडे जोर अधिक राहिला. यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पात १४५ टीएमसीवर ...

सातारा : जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत असून पश्चिमेकडे जोर अधिक राहिला. यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पात १४५ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. धरणे काठावर आली आहेत. तसेच कोयना, धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर भरले आहे. यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. यासाठी मान्सूनच्या पावसाकडे सर्वांच्याच नजरा असतात. जून महिन्यात वेळेवर पाऊस सुरू झाला तर पुढे फारशी चिंता राहत नाही. कारण, पेरण्यांना वेळेवर सुरूवात होते. तसेच धरण, पाझर तलावातही पाणीसाठा वाढतो. मागीलवर्षी मात्र, पावसाने चिंता वाढवली होती. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला होता. यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी या सारखी मोठे पाणीप्रकल्प भरले नव्हते. तर पाऊस कमी झाल्याने दुष्काळस्थिती निर्माण झालेली. दुष्काळ निवारणासाठी या मोठ्या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेले. त्यावेळी धरणे तळाला गेली होती. त्यामुळे यंदा धरणे भरणार का ? अशी चिंता होती. पण, मागील तीन महिन्यांत सतत पाऊस झाल्याने पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे.

पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी असे प्रमुख सहा मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पात १४८.७६ टीएमसी पाणीसाठा होतो. तर पूर्व भागातही नेर, आंधळी, पिंगळी, राणंद, येळीव असे लहान प्रकल्प आहेत. यावर्षी या सर्वच प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. पश्चिमेकडील सर्वच प्रमुख धरणे काठावर आली आहेत. या सहा प्रकल्पात सध्या १४५.४५ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे धरणे भरल्यातच जमा आहे. त्यातच पाऊस होत असल्याने धरणात आवक कायम आहे. पण, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करावा लागतोय. सर्वात मोठे कोयना धरण आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता धरणाची आहे. या धरणातील पाणीसाठा १४३ टीएमसीवर गेला आहे. हे धरण ९८.२५ टक्के भरलेले आहे. तसेच धोम, बलकवडी, तारळी, उरमोडी ही धरणेही काठावर आलेली आहेत. यामुळे विसर्ग करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील धरण पाणीसाठा (टीएमसीमध्ये)धरण - यंदा साठा - टक्केवारी - एकूण क्षमताकोयना - १०३.४१ - ९८.२५ - १०५.२५धोम - १३.०९ - ९६.४५ - १३.५०बलकवडी - ३.९३ - ९६.१९ - ४.०८कण्हेर - ९.६९ - ९५.७२ - १०.१०उरमोडी - ९.६० - ९६.२२ - ९.९६तारळी - ५.७३ - ९७.९४ - ५.८५

मागीलवर्षी १२२ टीएमसी पाणीसाठा..जिल्ह्यात मागीलवर्षी २८ आॅगस्टपर्यंत प्रमुख सहा प्रकल्पात १२१.९१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. यामध्ये तारळी, धोम, बलकवडी आणि कण्हेर धरणांत चांगला साठा होता. तर कोयना धरणात ८१ टक्क्यांवर पाणीसाठा होता. तर उरमोडी धरणात अवघे ६ टीएमसी पाणी होते. त्यातच सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झालेला. त्यामुळे धरणांत मोठ्या प्रमाणावर साठा वाढला नव्हता. परिणामी धरणे पूर्णपणे भरली नव्हती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणी