मल्हारपेठ : येथील संत तुकाराम विद्यालयासमोर गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मळीच्या टँकरने अचानक पेट घेतला. या आगीत टँकरचे संपूर्ण केबिन जळून खाक झाले. दरम्यान, आग आपोआप पूर्ण विझत आल्यानंतर खराब रस्त्यातून वाट काढत आलेल्या पाटण खरेदी-विक्री संघाच्या अग्निशामक पथकाने टँकरच्या केबिनवर पाण्याचा फवारा सोडला. त्यानंतर जळालेले केबिन पूर्णपणे विझले.
गुहाघर-पंढरपूर मार्गावर मल्हारपेठ येथील हायस्कूलसमोर पाटणच्या दिशेने जाणाऱ्या मळीच्या टँकरला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. धावत्या टँकरला आग लागल्यानंतर चालकाने महामार्गावर टँकर थांबवून खाली उडी घेतली. ही घटना समजताच त्याठिकाणी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली. पेटलेल्या टँकरजवळ फोटो, सेल्फी व व्हिडिओ काढणारांची संख्या मोठ्या प्रमाणात जमली. अधूनमधून टायर फुटल्याचे मोठे आवाज झाले की, बघे जोरजोरात पळत होते. मात्र सुरक्षेच्यादृष्टीने पोलीस यंत्रणेकडून उपाययोजना केली गेली नाही.पेटत्या टँकरच्या शेजारून वाहतूकआग लागल्यानंतर कºहाड व पाटणच्या दिशेने जाणारी वाहने पंधरा मिनिटे थांबली. मात्र पोलीस यंत्रणेच्या उपस्थितीत धोकादायक पेटलेल्या वाहनाच्या शेजारून दुचाकीसह चारचाकी गाड्या व ट्रकही जात होते. आग चालू असताना चुकून अचानक मोठी दुर्घटना घडली असती तर यास कोण जबाबदार ? अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.रुग्णवाहिका अग्निशामक यंत्रणेची गरजकºहाड-पाटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे लहान-मोठे अपघाताचे सत्र सुरू आहे. अचानक एखादी मोठी दुर्घटना झाल्यास जवळ अग्निशामक यंत्रणा किंवा रुग्णवाहिका नाही. वीस किलोमीटरच्या अंतरात तालुक्याच्या ठिकाणी पाटण व कºहाड येथे यंत्रणा आहेत. मल्हारपेठ परिसरातील भागात पोहोचण्यासाठी अंदाजे तीस मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागतो. त्यामुळे मल्हारपेठ किंवा नवारस्ता या ठिकाणी तातडीची सेवा म्हणून अग्निशामक व रुग्णवाहिका उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.