आॅनलाईन लोकमत
पाटण, दि. ४ : एखाद्या दगडी गुहेत राहतोय की काय? अशा अवस्थेत वास्तव्यास असलेल्या मेंढोशी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेल्या बोगेर्वाडीची धोकादायक कड्याखालून सुटका झालेली नाही. प्रत्येक दिवश मृत्यू उशाला घेऊन तेथील ग्रामस्थ जगत आहेत. बोगेर्वाडीच्या नवीन पुनर्वसित वसाहतीकडे शासनाचे म्हणावे तितके लक्ष नसल्यामुळे पुनर्वसन अर्धवटच आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गाव भुस्खलनात रात्री गायब झाले. त्यानंतर लोकमतने जिल्ह्यातील सातारा, पाटण, जावळी या दुर्गम तालुक्यांतील माळीण गावे शोधून काढली. तेथील लोकांचे प्रश्न प्रकषार्ने मांडले. त्यानंतर या गावांचे पुनर्वसन करण्याची आश्वासने दिली गेली. त्यानंतर माळीणचे पुनर्वसन झाले. तेथील शाळेची इमारत सोशल मीडियावर फिरत आहे. त्यानंतर पाटण तालुक्यातील माळीण गावाची काय अवस्था आहे, हे पाहिले असता पुनर्वसन झालेले नसल्याचेच समोर आले.
पुणे जिल्ह्यातील दुर्घटना झाली त्यावेळी पाटण तालुक्यातील बोगेर्वाडीची धास्ती सर्वांनाच लागून राहिली होती. तेथील ६१ कुटुंबे कड्याकपारीखाली राहत होती. कधी कडा कोसळेल आणि मोठी आपत्ती ओढावेल, हे शासनासह सर्वांनाच माहीत होते. माळीण दुर्घटनेपूवीर्ही बोगेर्वाडीचा प्रश्न गाजला होता. त्यासाठी माजी आमदार असो की विद्यमान दोन्ही लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षमतेप्रमाणे प्रयत्न केले. आजच्या स्थितीत ६१ पैकी ४१ कुटुंबांचे त्याच गावच्या हद्दीत पुनर्वसन झाले. आता फक्त दोन घरे त्या जुन्या कड्याखालच्या वस्तीत राहत आहेत. कारण त्यांची आर्थिक स्थिती घर बांधण्यासारखी नाही. शासनाने बोगेर्वाडीकरांना भूखंड दिला आहे. मात्र, घरे बांधण्यासाठी भरीव मदत केलेली नाही. नवीन पुनर्वसन गावठाणात रस्ते, नळयोजना अद्याप रोडावलेल्या अवस्थेत आहेत. (प्रतिनिधी)
सुरक्षेसाठी वृक्षारोपण बोगेर्वाडीतील त्या धोकादायक कड्याची दुरुस्ती केलेली आहे. तसेच कड्याच्या कपारी ढासळू नयेत, यासाठी त्यावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. तर जुनी वसाहत अद्याप कड्याखालीच आहे. त्यातील काही घरे मोडून काढण्यात आली आहेत. कोयना भूकंप पुनर्वसनचा काही निधी बोगेर्वाडीच्या पुनर्वसनासाठी दिला आहे. तर नूतन तहसीलदार रामहरी भोसले व प्रांताधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून शासनाचा निधी नुकताच काही महिन्यांपूर्वी बोर्गेवाडी ग्रामस्थांना वितरीत केला आहे. बोगेर्वाडीचे जवळपास पुनर्वसन झाले आहे. तरीही जुन्या गावठाणात अद्याप काही घरे वास्तव्य करत आहेत. नवीन पुनर्वसन गावठाणासाठी अजूनही निधी देणे आवश्यक आहे.
- संजय जाधव, सरपंच, मेंढोशी