शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

मलकापूर बनतेय ‘सोलर सिटी’

By admin | Published: February 13, 2015 12:06 AM

दोनशे मिळकतधारकांनी उपकरणे बसविली : आणखी चार हजार उपकरणे बसविण्याचे उद्दिष्ट; इंधनात बचत, घरपट्टीतही सूट

मलकापूर : सोलरसिटी अंतर्गत शहरामध्ये पहिल्या टप्प्यात २०० मिळकतदारांनी सोलर उपकरणे बसवल्याने इंधनात पन्नास टक्क्यांने बचत होत असल्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात किमान चार हजार मिळकतदारांना सोलर उपकरणे बसविण्याचे उद्दिष्ट नगरपंचायतीने ठरवले आहे. या योजनेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक मिळकतदाराला घरपट्टीत दहा टक्के सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरपंयाचतीने घेतला आहे. मलकापूर शहराने गेली सहा वर्षांत पाणी योजनेबरोबरच लक्षाधिश कन्यारत्न योजना, कन्या सुरक्षा अभियान, गरोदर माता दत्तक योजना, सांडपाणी प्रक्रिया योजना यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण योजना यशस्वी करून मलकापूरचे नाव देशात उंचावले आहे. त्याच पद्धतीने सोलरसिटी या योजनेअंतर्गत घरोघरी सोलर वापराचे उद्दिष्ट ठेवून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर सुमारे २०० मिळकतदारांनी या योजनेअंतर्गत सोलर उपकरणे घेतली आहेत. ही सोलर उपकरणे वापरल्यामुळे घरगुती गॅसच्या वापरात ५० टक्के बचत होत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर विजेवर पाणी गरम करणाऱ्या ग्राहकांची प्रतिदिन एक ते दोन युनीट विजेची बचत होत असल्याचेही दिसून आले आहे. अपारंपरिक ऊर्जा पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वात जास्त फायदेशीर आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर होणे गरजेचे आहे.हे ओळखून नगरपंचायत प्रशासनाने मलकापुरातील नागरिकांना सुधारित योजनेअंतर्गत अनेक फायदे देण्याचे जाहीर केले आहे. सुधारित योजनेनुसार किमतीच्या १५ टक्के नागरिकांचा स्वनिधी भरून उपकरणे बसवायची आहेत. १५ टक्के किंवा ३ हजार ३७५ पर्यंत नगरपंचायत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. उर्वरित ७० टक्के रक्कमेचा माफक व्याजदरात कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. सोलर वॉटर हिटर कार्यान्वित केल्यानंतर केंद्रीय नवीन व नवीकरण मंत्रालयाकडून नाबार्डद्वारा दहा टक्के किंवा २ हजार २५० रुपये नगरपंचायत विशेष अनुदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय मलकापूर सोलरसिटी योजनेत सहभाग घेतल्याबद्दल घरपट्टीत दहा टक्के सूट देण्याचीही घोषणा नगरपंचायत प्रशासनाने केली आहे. (प्रतिनिधी)पथदर्शी प्रकल्प शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याबरोबरच इंधन व वीज बचतीमुळे आर्थिक फायदाही होत आहे. त्याचबरोबर देशासह जगात प्रयत्न सुरू असलेल्या पर्यावरण संवर्धन उपक्रमासही सोलर वापरामुळे काही प्रमाणात हातभार लागणार आहे. त्या दृष्टीने मलकापूर सोलर सिटी प्रकल्प एक पथदर्शी प्रकल्प बनू शकतो. सोलर उपकरणे बसविण्यासाठी मलकापुरातील नागरिकांना ही एक सुवर्णसंधी आहे. एकाचवेळी संपूर्ण शहरात ही उपकरणे बसविणार असल्यामुळे बाजारभावापेक्षा कमी दरात ही उपकरणे उपलब्ध होणार आहेत. याशिवाय नगरपंचायतीस नाबार्डसारखे अनुदान प्राप्त होणार असल्यामुळे नागरिंकांना ही चांगली संधी आहे. - राजेंद्र तेली, मुख्याधिकारी