लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : मलकापूर शहरात आत्तापर्यंत एकूण २ हजार ४१७ बाधित झाले. त्यापैकी २ हजार २५९ जणांनी कोरोनावर मात केली. तर ६८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे शहराचा कोरोनामुक्ती दर वाढून ९३.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मृत्यूदर कमी होऊन २. ८ टक्के तर सक्रिय रुग्णसंख्या ३.७ टक्क्यांवर आली आहे. सध्या शहरात केवळ ९० बाधित कोरोनाशी लढा देत आहेत.
मलकापुरात पहिल्या टप्प्यात एका महिन्यात शहरात ३१ रुग्ण होते. पालिका, शासन व आरोग्य विभागाने कोरोना लढ्याचे योग्य नियोजन व उपचाराने एक महिन्यातच शहराला कोरोनामुक्त केले होते. मात्र एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाचा शिरकाव झाला होता. आणि शहरात टप्प्याटप्प्याने रुग्ण वाढतच गेले. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत तर कोरोनाने कहर केला होता. ऑक्टोबर महिन्यापासून बाधितांची संख्या कमी-कमी होत गेली. नोव्हेंबर महिन्यात दिवसाला सरासरी दोन-तीन जण, तर डिसेंबर महिन्यात केवळ १८ जणच बाधित सापडले होते. डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत बाधितांचा आकडा झपाट्याने कमी झाला होता. शहरात हळूहळू संख्या कमी झाली असली तरी बाधित होण्याचे थांबलेले नव्हते. जानेवारी महिन्यात पुन्हा वाढ होत गेली. १५ जण बाधित आले. फेब्रुवारीमधे १९ तर मार्च महिन्यात ७७ रुग्ण वाढले. यापुढे जाऊन ३ एप्रिल ते ६ मे एका महिन्यात तब्बल ४५३ बाधित सापडले, तर १६ जणांचा मृत्यू झाला. त्यापुढे मे महिन्यातही कोरोनाचा कहर सुरूच राहिला. ११ जूनअखेर ३५ दिवसांत तब्बल ५९२ जण बाधित सापडले होते. या १८ दिवसांत १७० जण बाधित सापडले असून, केवळ पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
(चौकट)
१३ महिन्यांचा लेखाजोखा
२२ एप्रिल ते २४ मे ३१,
२५ मे ते २५ जून ०,
२६ जून ते २६ जुलै ४३,
२७ जुलै ते २६ ऑगस्ट ३३८,
२७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर ४२८,
२७ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर १५९,
२८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर ६९,
२८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर १८,
३१ डिसेंबर ते ३० जानेवारी १५,
३१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी १९,
१ मार्च ते २ एप्रिल ७७,
३ एप्रिल ते ६ मे ४५३,
७ मे ते ११ जून ५९२,
११ जून ते २८ जून १७०,
चौकट
सक्रिय रुग्ण शंभरीच्या आत
एकूण- २४१७,
मृत्यू - ६८,
डिस्चार्ज - २२५९,
उपचरार्थ - ९०,
त्यापैकी रुग्णालयात - ४४,
होम आयसोलेट - ४६,
(चौकट)
तीन महिन्यांत १ हजार २१५ बाधित
मलकापुरात एकूण २ हजार ४१७ बाधित सापडले. त्यापैकी २ हजार २५९ जणांची कोरोनावर मात केली. ६८ बाधितांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ९० जण उपचार घेत आहेत. बाधितांपैकी या तीन महिन्यांत १ हजार २१५ बाधित आले आहेत. यावरून या तीन महिन्यांतील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभागाचे धाबेच दणाणले होते.